व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Nagpur municipal corporation: उंच इमारतींच्या टेरेसचा गैरवापर; नागपूर महापालिकेची कारवाई, ७ सर्वेक्षण...

Nagpur municipal corporation: उंच इमारतींच्या टेरेसचा गैरवापर; नागपूर महापालिकेची कारवाई, ७ सर्वेक्षण पथके नेमली

Misuse of terraces in high-rise buildings; Nagpur Municipal Corporation cracks down, deploys seven survey teams : व्यावसायिक इमारतींवर बार आणि रेस्टॉरेंट उघडण्यात आल्याचे उघडकीस

Nagpur नागपूर महानगरपालिका हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणावर रहिवास, व्यावसायिक आणि औद्योगिक स्वरूपाची बांधकामे सुरू आहेत. मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील (UDCPR) तरतुदींनुसार सर्व प्रकारच्या वापरांना नियमांनुसार बांधकाम परवानगी निर्गमित केली जाते. मात्र, अनेक विकासक आणि अर्जदारांनी मंजुरी मिळवताना टेरेस मजल्यावर ‘एसी प्लांट रूम’ दाखवून नकाशे मंजूर करून घेतले असले, तरी प्रत्यक्षात मात्र मंजूर नकाशाच्या विसंगत या जागेचा वापर केला जात असल्याचे गंभीर प्रकार मनपाच्या निदर्शनास आले आहेत. काही व्यावसायिक इमारतींवर तर थेट बार आणि रेस्टॉरेंट उघडण्यात आल्याचे समोर आले आहे.

या सर्व गंभीर प्रकाराची दखल घेत मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. याप्रसंगी नगर रचना विभागाचे सहायक संचालक ऋतूराज जाधव यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मंजूर नकाशाच्या विसंगत सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट करत, या अनधिकृत वापरावर कडक कारवाई करण्यासाठीचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले.

Graduate constituency election: शिक्षक भारतीकडून अतुल देशमुख यांची उमेदवारी जाहीर; विद्यमान आमदार अभिजित वंजारींशी होणार थेट लढत

या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने ७ विशेष सर्वेक्षण पथकांची स्थापना केली आहे. ही पथके शहरात सुरू असलेल्या अशा बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी करून, “एसी प्लांट/रूमचा वापर मंजूर बांधकाम नकाशांनुसारच होत आहे की नाही?” याची सखोल तपासणी करणार आहेत. ही सर्व पथके आगामी १५ दिवसांच्या आत आपला सविस्तर अहवाल मनपा प्रशासनाला सादर करतील, असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

Prashant Kishore: भाजपला मोठा धक्का! राष्ट्रीय अध्यक्षांची जागा गमावली; प्रशांत किशोर धडकले विधानसभेत

आयुक्त डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले की, सर्वेक्षण पथकाच्या अहवालात जर बांधकामाची मंजुरी आणि प्रत्यक्ष वापर यात तफावत किंवा विसंगती आढळल्यास, अशा बांधकामांवर ‘महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६’ मधील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, तपासणीसाठी येणाऱ्या मनपाच्या सर्वेक्षण पथकाला पूर्ण सहकार्य करावे आणि नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेने सर्व संबंधित विकासक, भूखंडधारक आणि बांधकाम व्यावसायिकांना केले आहे.

error: Content is protected !!