व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Operation Tiger : ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा भूकंपाची चाहूल?

Operation Tiger : ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा भूकंपाची चाहूल?

shivsena-operation-tiger-3-discussion-after-shrikant-shinde-meets-amit-shah : अमित शाह-शिंदे भेटीनंतर ‘ऑपरेशन टायगर ३’च्या चर्चांना उधाण

New Delhi : राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगू लागली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ‘ऑपरेशन टायगर’च्या तिसऱ्या टप्प्याबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अमित शाह यांच्यासोबतची ही दुसरी बैठक असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत नरेश मस्के, नागेश पाटील आष्टीकर, संजय पाटील तसेच विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी राज्यातील आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात आहे.

 

Dr D Y patil : माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून राज्यभर पक्षविस्तारावर भर दिला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी विविध स्तरांवर हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. अशातच ठाकरे गटातील काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर शिंदे गटाची नजर असल्याच्या चर्चांनाही पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.

Cabinet decision : शेतकरी, शेतमजूर आणि न्यायव्यवस्थेला मोठा दिलासा

यापूर्वीही शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले होते. आता पुन्हा एकदा अमित शाह आणि शिंदे गटातील नेत्यांच्या बैठकीनंतर ‘ऑपरेशन टायगर ३’ सुरू होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या भेटीनंतर ठाकरे गटातील नेत्यांकडून कोणती प्रतिक्रिया येते आणि आगामी काळात राज्याच्या राजकारणात कोणत्या नव्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
__

error: Content is protected !!