Controversial statements by allied party leaders have increased Mahayuti’s headache : राजकीय रणांगणात तापलेला मुद्द्यावर त्वरित कारवाईची शक्यता धूसर
महाराष्ट्रातील महायुती सरकार गेल्या काही महिन्यांपासून स्वतःच्या मित्रपक्षांतील वादग्रस्त नेत्यांमुळे अडचणीत सापडले आहे. मंत्र्यांवर भ्रष्टाचार, बेकायदेशीर व्यवहार, वादग्रस्त विधाने आणि संशयास्पद संबंधांचे आरोप होत आहेत, मात्र त्यावर तात्काळ कारवाई झालेली नाही. विरोधकांनी हा मुद्दा हाताशी घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव टाकला असून, त्यांना ‘असहाय’ अशी प्रतिमा दिली आहे. जनआक्रोश आंदोलन, घोषणाबाजी आणि थेट आरोपांमुळे हा मुद्दा राजकीय रणांगणात तापलेला आहे.
संजय शिरसाट, योगेश कदम, संजय राठोड, दादा भुसे, माणिकराव कोकाटे यांच्याशी संबंधित प्रकरणांनी महायुतीची प्रतिमा डागाळली आहे. काही नेत्यांच्या व्हिडीओंमधील आर्थिक किंवा नैतिक प्रश्न, तर काहींवर थेट बेकायदेशीर धंद्यांचे आरोप झाले आहेत. या प्रकरणांत सरकारची कारवाई संथ असून, केवळ प्रतीकात्मक बदल किंवा जबाबदारीतील फेरबदल करण्यात आले आहेत.
Cabinet meeting : 15 हजार पोलिस भरतीसह चार महत्त्वाचे निर्णय
या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर मित्रपक्षांच्या दबावाखाली असल्याचा आरोप केला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांनी वादग्रस्त मंत्र्यांना त्वरित पदावरून काढण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील बैठकींमध्येही हा मुद्दा चर्चेत असल्याची जोरदार चर्चा आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी कारवाई टाळण्याची भूमिका घेतली गेली आहे.
Bhaskar Jadhav : ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री; राजकीय कारकीर्द संपली तरी हरकत नाही !
२९ जुलैच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व वादग्रस्त मंत्र्यांना कडक इशारा दिला असून, डिसेंबरमध्ये सरकारचे एक वर्ष पूर्ण झाल्यावर प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करून अपयशी ठरलेल्यांवर कारवाई करण्याची तयारी असल्याचे संकेत आहेत. भाजपा नेतृत्वाने फडणवीस यांची प्रतिमा स्वच्छ आणि विश्वासार्ह असल्याचे ठामपणे सांगत विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत. तरीही, सध्या तरी महायुती सरकारला मित्रपक्षांच्या प्रतापामुळे राजकीय वादळाचा सामना करावा लागत आहे.








