Election Commission’s work to be accelerated : निवडणूक आयोगाच्या कामाला वेग
Mumbai : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागरचना जाहीर होण्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबईसह गट अ, ब आणि क वर्गातील महापालिकांची प्रारूप प्रभागरचना सोमवारी म्हणजेच 25 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही महापालिकांकडून प्रस्ताव उशिरा प्राप्त झाल्याने प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात विलंब झाला होता.
प्रभागरचना प्रसिद्धीनंतर नागरिक, राजकीय पक्ष आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून हरकती व सूचना मागवण्यात येतील. या हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम प्रभागरचना तयार करून नगर विकास विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभागरचनेला मान्यता दिली जाईल आणि अधिसूचनेद्वारे ती जाहीर केली जाईल.
Demand of loan waiver : मी मेल्यानंतर तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या !
राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, वसई विरार आणि नवी मुंबई या महापालिकांची प्रभागरचना आयोगाला प्राप्त झाली असून सोमवारी बहुतांश प्रभागरचना जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, ड गटातील महापालिकांची प्रभागरचना 3 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार, म्हणाले..
प्रभागरचनेच्या प्रक्रियेचा आराखडा देखील निश्चित करण्यात आला आहे. 22 ते 28 ऑगस्टदरम्यान प्रारूप प्रभागरचनेवर हरकती व सूचना मागवण्यात येतील. 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरदरम्यान सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर प्रभागरचना अंतिम करून नगर विकास विभागाला पाठवली जाईल. 22 ते 26 सप्टेंबरदरम्यान अंतिम प्रभागरचना विभागाकडून आयोगाला सादर केली जाणार आहे. अखेर 3 ते 6 ऑक्टोबरदरम्यान आयोगाकडून अंतिम प्रभागरचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली जाईल.
Farmer loan waiver : शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवारांचे महत्त्वाचे विधान!
दरम्यान, प्रभागरचना जाहीर होताच संबंधित महापालिका क्षेत्रातील राजकीय नेते आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार असून राजकीय पक्षांमध्ये चुरस रंगण्याचे संकेत आहेत.
____








