Everyone from President to Prime Minister gave best wishes : राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांनी दिल्या शुभेच्छा
Mumbai : बुधवारी देशभरात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचा शुभारंभ झाला. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात ‘गणपति बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने वातावरण भारावून गेले आहे. घराघरांत, सोसायट्यांत, सार्वजनिक मंडळांत आणि भव्य पंडालांमध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. सकाळपासूनच भक्तिगीतं, आरत्या आणि ढोल-ताशांच्या निनादात श्रद्धाळूंच्या मनात उत्साह आणि भक्तीचा उन्मेष दिसून येत आहे.
या पावन पर्वाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशातील सर्वोच्च नेतेही पुढे आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देताना म्हटले, “भक्ती आणि आस्थेने भरलेला हा सण सर्वांच्या आयुष्यात मंगलमय ठरो. भगवान गजानन सर्वांना सुख, शांती आणि उत्तम आरोग्य देवोत.” तर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडियावर संदेश देत सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या संदेशात गणेशोत्सव हा बुद्धी आणि विवेकाचे दैवत असलेल्या भगवान गणेशाचा जन्मोत्सव असून, राष्ट्रनिर्मितीच्या मार्गातील अडथळे दूर व्हावेत आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारून भारत अधिक सक्षम व्हावा, अशी प्रार्थना केली.
Police Commissioner : कुत्रा फिरवताय.. सावधान ! तोंडावर जाळी आणि पट्ट्यावर मालकाचे नाव लिहा !
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. देश-विदेशातील लाखो भाविकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेला हा उत्सव यंदा अधिकच रंगतदार ठरणार आहे. कारण नुकत्याच राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य उत्सव’चा दर्जा दिला आहे.
दरम्यान, मुंबईच्या लालबागचा राजा या देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि मानबिंदू मानल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीचे दर्शन यंदाही प्रमुख आकर्षण ठरले आहे. रविवार रोजी पहिल्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. 1934 पासून भाविकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लालबागच्या राजाची कलात्मक भव्यता आणि त्यामागचा आठ दशकांपेक्षा जुना परंपरेचा वारसा पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करत आहेत.
Manoj Jarang’s Agitation : जरांगेंच्या आंदोलनावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ‘वेट अॅंड वॉच’
गणेशोत्सव म्हणजे भक्ती, परंपरा, सामाजिक सलोखा आणि कलात्मकतेचा अनोखा संगम. घराघरांत मोदकांचा सुगंध दरवळतो आहे, पंडालांत रंगीबेरंगी सजावट आणि दिव्यांच्या रोषणाईने चैतन्य संचारले आहे. राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांपर्यंत, अभिनेते, राज्यकर्त्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण एका सुरात एकाच घोषात सामील झाले आहेत “गणपति बाप्पा मोरया!”
___








