What is the Smart Digital Village project in Maharashtra : महाराष्ट्रातील ‘स्मार्ट डिजिटल व्हिलेज’ प्रकल्प काय आहे?
Nagpur : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील सातनवरी या गावात भारतातील पहिले ‘स्मार्ट आणि इंटेलिजेंट व्हिलेज’चे उदघाटन केले आहे. राज्य सरकार आणि खासगी क्षेत्राच्या भागीदारीतून राबविण्यात आलेल्या या ‘स्मार्ट डिजिटल व्हिलेज’ प्रकल्पात ग्रामीण विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
नागपूर शहरापासून अवघ्या ३१ किलोमीटर अंतरावर असलेल्या सातनवरी गावात स्मार्ट शेती, टेलिमेडिसिन, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पाणी निरीक्षण, स्मार्ट देखरेख प्रणाली आणि डिजिटल वर्गखोल्यांसारखे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.
Adivasi Pardhi Development Council : बीडममध्ये पारधी समाजावर अन्यायाचा कळस
हा प्रकल्प व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेस व्हाईस या दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या संघटनेने प्रस्तावित केला होता. यावर्षी १९ जून रोजी व्हाईसच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली. स्वातंत्र्य दिनापर्यंत हा पथदर्शी प्रकल्प पूर्ण करण्यात आला आणि नुकतेच त्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
‘स्मार्ट इंटेलिजेंट व्हिलेज’ या संकल्पनेमागे डिजिटल तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्ज, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अखंड कनेक्टिव्हिटीच्या साहाय्याने ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनमान उंचावणे हा उद्देश आहे. या गावात शेतकरी ड्रोन, सेन्सर्स आणि स्मार्ट फॉर्मिंगच्या माध्यमातून शेती करत आहेत. आरोग्य सुविधा थेट मोठ्या रुग्णालयांशी जोडल्या गेल्या आहेत. शाळांमध्ये एआय तंत्रज्ञानावर आधारित वर्गखोल्या आहेत, अंगणवाड्यांचे डिजिटायझेशन झाले आहे आणि गावात सुरक्षेसाठी स्मार्ट देखरेख प्रणाली बसविण्यात आली आहे.
Sudhir Mungantiwar : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापना
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “सातनवरीने स्मार्ट तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण केले होते. त्यामुळे देशातील पहिले स्मार्ट गाव म्हणून या गावाची निवड करण्यात आली. हा प्रकल्प ग्रामीण परिवर्तनासाठी आदर्श मॉडेल ठरेल. प्रत्येक तालुक्यात १० स्मार्ट व्हिलेज विकसित करून हळूहळू तो संपूर्ण राज्यात विस्तारला जाईल.” सातनवरी गावातील या तंत्रज्ञानाधारित उपक्रमांमुळे ग्रामीण भारताच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात असून, भविष्यात संपूर्ण देशातील गावांसाठी हा एक दिशादर्शक प्रकल्प ठरणार आहे.
___








