Minister’s assurance to distribute workers’ kits within seven days : काँग्रेसच्या मागणीनंतर सात दिवसांत वितरण करण्याचे आश्वासन
Chikhali शासनाकडून नोंदणीकृत कामगारांना दिल्या जाणाऱ्या कीटच्या वितरणात तांत्रिक अडथळ्यामुळे चिखली तालुका व शहरातील सुमारे २०० ते ३०० कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. नियोजित दिवशी कामगार उपस्थित असूनही सर्व्हर डाऊनमुळे कीट मिळू शकली नाही. अर्ज बाद होण्याची वेळ आल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी होती.
ही बाब समजताच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी तात्काळ मैदानात उतरून कामगारांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका घेतली. संबंधित अधिकाऱ्यांसह त्यांनी थेट कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्याशी संपर्क साधून सात दिवसांत कीट वितरण करण्याचे आश्वासन मिळवले.
Sudhir Mungantiwar : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापना
याप्रसंगी राहुल बोंद्रे यांनी शासन आणि ठेकेदार यांच्यावर तीव्र शब्दात टीका करत कामगारांचे हक्क अबाधित ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. “गोरगरीब व वंचित कामगारांना अन्याय होऊ देणार नाही, आवश्यक असेल तर मोठे आंदोलन उभारू,” असा इशाराही त्यांनी दिला. या घडामोडीनंतर कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले असले तरी या घटनेमुळे शासनाच्या तांत्रिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या पुढाकारामुळे हा विषय पुन्हा राजकीय रंग घेताना दिसत आहे.
farmers affected by heavy rains : नियम धाब्यावर बसवून पंचनामे; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा संताप
या आंदोलनावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल सवडतकर, तालुकाध्यक्ष रामभाऊ जाधव, युवक शहराध्यक्ष रिकी काकडे, युवक तालुकाध्यक्ष अंबादास वाघमारे, खविस अध्यक्ष ईश्वरराव इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.








