Breaking

Dr. Pankaj Bhoyar : आम्ही सुधारणा करू, तुम्ही सूचना करा!

 

We are ready to improve the education system : राज्यमंत्र्यांचे शिक्षक, पालकांना आवाहन

Wardha शिक्षण प्रणालीवर कायम बोट ठेवण्यात येत असते. बरेचदा पालक आणि शिक्षकांकडूनच यासंदर्भात वेगवेगळी मतं मांडली जातात. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने तर या चर्चेला अधिकच वाट मोकळी करून दिली आहे. अशा परिस्थितीत राज्यमंत्री डॉ. पकंज भोयर यांनी थेट पालक आणि शिक्षकांनाच आवाहन केले आहे. आम्ही शिक्षण प्रणालीत सुधारणा करायला तयार आहोत, तुम्ही सुधारणा करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

शिक्षण प्रणालीत आमुलाग्र बदल होत आहे. सर्वांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शिक्षण प्रणालीतील सुधारणांबाबत शिक्षक व पालकांनी सूचना कराव्या, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण, गृह (ग्रामीण), सहकार, खनिकर्म व गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

Prataprao Jadhav Akash Fundkar performed Mahapuja : जय जिजाऊ… जयघोषाने दुमदुमले मातृतीर्थ!

शिक्षण विभागातर्फे बोरगाव मेघे येथील स्व. आनंदराव मेघे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दि. १० व ११ जानेवारी रोजी आयाेजित तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन १० जानेवारी रोजी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय भुते होते. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी डॉ. धर्मपाल कुमरे, शिक्षण विस्तार अधिकारी परमार, पंचायत समितीचे माजी सभापती महेश आगे, शारदा तडस, नितीन डफळे, अजय वरटकर, विजय ताजणे, पृथ्वीराज शिंदे, चरण चांभरे उपस्थित होते.

Pravin Darekar : दरेकरांनी स्पष्टच सांगितलं, ‘पत्रकार नेत्यांची दिशा बदलवू शकतात’

नामदार भोयर यांनी नवीन वर्षात नवे संकल्प घेऊन कार्य करतो. प्रत्येक व्यक्ती दैनंदिन जीवनात समाजासाठी कार्य करत असतो. शिक्षकसुद्धा भावी पिढी घडवण्याचे कार्य करतात. शाळेच्या माध्यमातून मुलांमध्ये अनेक चांगल्या गोष्टींचे महत्त्व पटवून देण्यासाठी नवीन आदर्शवादी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांचा प्रयत्न असतो. जिल्ह्यात शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, या प्रणालीत काही अडचणी असू शकतात. त्या दूर करण्यासाठी व त्यामध्ये बदल घडविण्यासाठी आपण सूचना कराव्या.

या सूचनांची दखल घेऊन शिक्षण विभागाच्या माध्यमातून बदल घडवू, असे ते म्हणाले. मेघे विद्यालयाने शाळेत बॅंड पथक व म्युझिक लॅबची मागणी केली. ही मागणी लवकरच पूर्ण केली जाईल. लॅबचा उपयोग शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच गावातील विद्यार्थ्यांनादेखील व्हावा, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी डॉ. कुमरे यांनी केले. कार्यक्रमाला विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते