व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home प्रशासकीय Tigress attack : वाघिणीच्या हल्ल्यानंतर मंत्रालय अलर्ट मोडवर, वनविभागाची तातडीची बैठक

Tigress attack : वाघिणीच्या हल्ल्यानंतर मंत्रालय अलर्ट मोडवर, वनविभागाची तातडीची बैठक

Forest Department goes on alert after tigress attack; emergency meeting convened : तातडीने रेस्क्यू पथके पाठविण्याच्या सूचना, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

Amravati वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि वन्यप्राण्यांना पकडण्यासाठीची बचाव मोहीम यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी दिले. बाधित भागात तातडीने रेस्क्यू पथके रवाना करून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे, तसेच संपूर्ण मोहिमेदरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाची यंत्रणा पूर्ण क्षमतेने सतर्क ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत अमरावती वन विभागाच्या हद्दीतील वाघिणीच्या हल्ल्याबाबत बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आमदार रवी राणा, गजानन लवटे, उमेश यावलकर, प्रताप अडसड, विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे-पाटील, वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते.

Teachers constituency elections : पक्षाने तिकीट दिले नाही तरी मैदानात उतरणार!

दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार राजेश वानखडे, प्रवीण तायडे, केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अमरावती वन विभागाच्या मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी तसेच वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.

वन्यप्राण्यांच्या हालचालींची माहिती ज्या भागातून प्राप्त होत आहे, त्या परिसरात कोणताही विलंब न करता रेस्क्यू पथक पाठवावे. नागरिकांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात, अशा सूचना बावनकुळे यांनी दिल्या.

वडाडा येथील रेस्क्यू सेंटर तातडीने कार्यान्वित करून मोहिमेसाठी आवश्यक मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्था आणि साधनसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावी. रेस्क्यू कारवाईदरम्यान मनुष्यबळ किंवा सुरक्षाव्यवस्थेची कमतरता भासणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

Sanjay Gaikwad : ‘बाई, बापासारखं शरीर कुठून आणणार?’; संजय गायकवाडांच्या वक्तव्याने नवा वाद

शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या

रेस्क्यू मोहिमेदरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्यांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही महसूलमंत्र्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी आणि संबंधित मुख्य वनसंरक्षक यांनी समन्वयाने हा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. झालेल्या नुकसानीची क्षेत्रनिहाय आणि हेक्टरनिहाय माहिती प्रस्तावात स्पष्टपणे नमूद करावी, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले.

error: Content is protected !!