व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Maratha – OBC Movement : मराठा – ओबीसी आंदोलनांमुळे सरकारपुढे पेच !

Maratha – OBC Movement : मराठा – ओबीसी आंदोलनांमुळे सरकारपुढे पेच !

Big problem if the protests of both communities do not stop in time : दोन्ही समाजाची आंदोलने वेळेत न थांबल्यास मोठी फजिती

Mumbai : मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण जरांगे यांच्या आंदोलनाला उत्तर म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघानेही आक्रमक भूमिका घेत नागपूरमध्ये संविधान चौकात शनिवारपासून साखळी उपोषण करण्याची आणि गरज पडल्यास मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

सरकारने जरांगे यांच्या आंदोलनावर निर्बंध घातले आहेत. शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेतच आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच जास्तीत जास्त पाच हजार कार्यकर्त्यांनाच प्रवेश असेल, अशा अटी पोलिसांनी लादल्या आहेत. मात्र जरांगे यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार स्पष्ट केला आहे. ते आझाद मैदानात दाखल असून त्यांनी उपोषण सुरू केले आहे.

Maratha movement : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात सर्वपक्षीयांचा सहभाग !

सरकारसमोर आता प्रश्न उभा राहिला आहे की, जरांगे यांनी बेमुदत ठिय्या सुरू केला तर परिस्थिती हाताळायची कशी. कार्यकर्त्यांची संख्या वाढत गेली, मराठा समाजाचा प्रतिसाद मोठा मिळाला, तर पुढील रणनीती काय असावी यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहखात्याचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्यात चर्चा सुरू आहे.

India is Hindu nation : भारत हा अखंड आणि हिंदू राष्ट्रच आहे !

गणेशोत्सवाचा काळ आणि मुंबईतील मुसळधार पावसाची परिस्थिती यामुळे आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहून सरकारचा पुढील निर्णय ठरणार आहे. मात्र जरांगे यांनी बेमुदत आंदोलन सुरू केल्यास राज्य सरकार व पोलिस यंत्रणेसाठी मोठी पंचाईत निर्माण होणार आहे.

error: Content is protected !!