व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Abhijeet Dipke : भाजपमध्ये या, नाहीतर ठोकू, कुटुंबालाही धमक्या दिल्याचा दावा

Abhijeet Dipke : भाजपमध्ये या, नाहीतर ठोकू, कुटुंबालाही धमक्या दिल्याचा दावा

abhijeet-dipke-alleges-threats-from-bjp-and-pressure-over-protest : अभिजीत दीपकेचा खळबळजनक आरोप

Chhatrapati Sambhajinagar : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडून धमक्या मिळाल्याचा गंभीर आरोप केला आहे. आंदोलन संपल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी परतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक धक्कादायक दावे केले. “भाजपमध्ये सामील व्हा किंवा आंदोलन मागे घ्या, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल,” अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्याचा आरोप दीपके यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, त्यांना अनेक वेळा भाजपमध्ये येण्याच्या ऑफर देण्यात आल्या. मात्र, आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मला भाजपमध्ये जायचे असते, तर मी यापूर्वीच गेलो असतो. मात्र, माझ्या विचारांशी तडजोड करायची नाही,” असे ते म्हणाले.

दीपके यांनी दावा केला की, आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. “भाजपमध्ये सामील झाला तर ठीक आहे, अन्यथा आंदोलन थांबवा. नाहीतर तुम्हाला ठोकू, गोळ्या घालू,” अशा शब्दांत धमक्या देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “हीच भाजप आणि संघाची प्रेमाची भाषा आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

CET-MPSC Paper leak: सीईटी-एमपीएससी पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही धमकावण्यात आल्याचा आरोप केला. “आई-वडिलांनाही लक्ष्य करण्यात आले. तुमच्या घरी येऊन पाहून घेऊ, असे सांगण्यात आले. माझ्या कुटुंबाला या प्रकरणात ओढण्याचे प्रयत्न झाले,” असा दावा दीपके यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत दीपके म्हणाले, “मी त्यांच्या नातवाच्या वयाचा आहे. तीस वर्षांच्या तरुणाला अशा प्रकारच्या धमक्या देणे योग्य आहे का? सत्तेत असलेल्या लोकांनी अशा प्रकारे वागणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.”

Akola municipal corporation: भूखंड आरक्षण घोटाळ्यावर महापालिका आक्रमक; सर्वोच्च न्यायालयात धाव

दरम्यान, अभिजीत दीपके यांनी केलेल्या आरोपांवर भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील काळात या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!