Administration insisting for tax recovery : शिवसेना नेते म्हणतात, शास्ती माफ करा
Akola महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचा कोट्यवधीचा कर थकीत आहे. त्यामुळे आर्थिक गाडा डळमळीत झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने सक्तीने करावसुलीचा निर्णय घेतला आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाने थकीक करावरील शास्ती माफ करावा. आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रशासन आणि राजकीय पक्ष या प्रश्नावरून आमने-सामने उभे ठाकण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्यातर्फे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शास्ती माफ करण्याबाबत मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांना निवेदन दिले. महानगरपालिकेने अनेक वर्षापासून मालमत्ता करामध्ये भरमसाठ वाढ केली. तसेच स्वाती इंडस्ट्रीच्या नाकर्तेपणामुळे महानगरपालिकेला मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट गाठता आले नाही. शहरातील नागरिकांना मालमत्ता कर भरण्यास दिलासा मिळावा व महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याबाबतचे निवेदन करण्यात आले आहे.
Nagpur Police : तिचा ओरडण्याचा आवाज आला… लोकांना वाटले अपहरण !
राज्याच्या महायुती सरकारमध्ये शिवसेना शिंदे गट सत्तेत आहे. शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी निवेदन करण्यासाठी केले. आयुक्तांऐवजी त्यांचे पीए जितेंद्र तिवारी यांनी निवेदन स्वीकारले. याबाबत पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. निवेदन देते वेळी शिवसेनेचे निवासी उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक संतोष अनासने, उपजिल्हा प्रमुख गोपाल म्हैसने, जिल्हा सचिव सतीश गोपनारायण तालुका प्रमुख विजय वानखेडे, तालुका संघटक रमेश थुकेकर, उपशाहर प्रमुख स्वप्नील देशमुख, शहर संघटक राजेश पिंजरकर, जिल्हा सरचिटणीस राहुल जाधव, विधानसभा प्रमुख संजय रोहनकार, सूरजसिंह राजपूत हजर होते.
अकोला महापालिकेवर तीन वर्षांपासून प्रशासक नियुक्त आहे. या दरम्यान शहरातील मालमत्तांच्या करात मोठी वाढ करण्यात आली होती. त्यावरून राजकीय पक्ष व प्रशासनामध्ये चांगलाच वाद झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला. आणि करवाढीचा प्रस्ताव थांबवावा लागला होता. 2017 मध्ये महापालिकेने कर वाढ केली होती. त्यावेळी भाजप सत्तेवर होती.
या करवाढी विरोधात काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक डॉ.झिशान हुसेन व शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी उपोषण केले होते. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात याचीका काही दाखल करण्यात आली आहे. त्याच्या निकाल अद्याप लागलेला नाही.