Vidarbha Farmers : १ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी शक्य !

 

1 lakh quintal of soybeans can be purchased : प्रशासनाला विश्वास; नाफेडतर्फे खरेदीला सुरुवात

Wardha आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात नाफेड मार्फत १५ ऑक्टोबर २०२४ पासून सोयाबीन खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मागील काही दिवसांत शेतकरी नोंदणी व खरेदीच्या प्रक्रियेत वाढ झालेली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ७६ हजार २१३.७६ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. ३ हजार ८१५ शेतकऱ्यांनी आधारभूत सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घेतला असल्याचे जिल्हा पणन अधिकारी बी.वाय. शेख यांनी सांगितले.

उर्वरित अंदाजे १ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या बारदानाचा तुटवडा असल्यामुळे मुबंई येथील मुख्य कार्यालयास २ लाख बारदान्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. नवीन बारदाना ३ ते ४ दिवसांत उपलब्ध होणार आहे. बारदाना प्राप्त होताच सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही शेख यांनी सांगितले.

Akola Municipal Corporation : कर वसुलीसाठी प्रशासन आग्रही

जिल्ह्यातील वर्धा येथील केंद्रावर १ हजार ५४९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ६४७ शेतकऱ्यांकडून १३ हजार २७०.९ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. देवळी येथे १ हजार २७३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ५०२ शेतकऱ्यांकडून ९ हजार ४०२.१ क्विंटल, पुलगाव येथे ६०३ शेतकरी नोंदणी, २१३ शेतकऱ्यांकडून ३ हजार ७६३.४ क्विंटल खरेदी झाली आहे.

Mahametro Nagpur : मेट्रो स्थानकांवरून फिडर सेवा !

कारंजा २६५ शेतकरी नोंदणी २१ शेतकऱ्यांकडून ३३६.१ क्विंटल खरेदी, आष्टी येथे ७१३ शेतकरी नोंदणी २५८ शेतकऱ्यांकडून ४ हजार ५३७.५ क्विंटल खरेदी, हिंगणघाट येथे १ हजार ७९१ शेतकरी नोंदणी, ९७४ शेतकऱ्यांकडून १८ हजार ७५८.९ क्विंटल खरेदी, समुद्रपूर येथे १ हजार २३१ शेतकरी नोंदणी, ५४५ शेतकऱ्यांकडून ११ हजार ८३०.२ क्विंटल खरेदी, जाम येथे १ हजार ५७९ शेतकरी नोंदणी ६५५ शेतकऱ्यांकडून १४ हजार ३१४.७ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील आठही खरेदी केंद्रांवर एकूण ९ हजार ४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून ३ हजार ८१५ शेतकऱ्यांकडून ७६ हजार २१३.७६ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे