Kirit Somaiya : अकोल्यात ४ हजार जन्मप्रमाणपत्रांचा घोटाळा

BJP leader alleges scam of 4,000 birth certificates in Akola : पोलिस तपास म्हणजे बनवाबनवी असल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

Akola अकोला शहरासह जिल्ह्यात सुमारे चार हजार बनावट जन्मप्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा पर्दाफाश भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला असून, महसूल विभाग आणि पोलिसांकडून या प्रकरणातील तपास बनवाबनवी स्वरूपाचा असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

सोमय्या यांनी ३ सप्टेंबर रोजी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीत महसूल विभाग आणि अकोला पोलिस दलाने पुरेशा पुराव्यांनंतरदेखील योग्य ती कारवाई केली नसल्याचे नमूद केले आहे.

सोमय्या यांनी दिलेल्या दस्तऐवजांनुसार, अर्ज क्रमांकासह सादर केलेल्या पुराव्यातील जन्मतारीख (आधारकार्ड) आणि शपथपत्रातील जन्मतारीख या वेगवेगळ्या असल्याची १३३ अर्जदारांची उदाहरणे आहेत. एवढेच नव्हे, तर १० अर्जदारांची जन्मतारीख “०१ जानेवारी” अशीच नमूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

Mahayuti Government : शेतरस्ता मोकळा करण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

या प्रकरणी तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, पोलिसांनी केवळ १२ जणांवरच गुन्हा दाखल केला. उर्वरित अर्जदारांनी दिलेल्या संशयास्पद कागदपत्रांची चौकशीच झाली नाही, असा सोमय्यांचा आरोप आहे.

अकोला तहसील कार्यालयात एकूण ४ हजार ८४९ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २४ अर्ज फेटाळण्यात आले तर ३ हजार ९५३ जणांना विलंबित जन्मनोंद प्रमाणपत्रे जारी करण्यात आली. उर्वरित अर्जांवरही सखोल चौकशी न करता प्रशासनाने तपास थांबविल्याचे सोमय्यांनी सांगितले.

Mahayuti government : सरकारच्या निषेधात आरोग्य कर्मचाऱ्यांनी थाळ्या वाजवल्या!

घोटाळ्यात थेट सहभाग किंवा पाठबळ देणाऱ्या एजंट आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. त्यांनी अशा १०० लोकांची यादीही प्रशासनास सादर केली असून, त्यात आधारकार्डावरील जन्मतारीख व जन्मप्रमाणपत्रावरील जन्मतारीख वेगवेगळी असल्याचे नमूद आहे.

या प्रकरणी आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, जिल्हाधिकारी वर्षा मीणा, पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.