The Mahayuti government granted legal reservation to the Maratha community : महायुती सरकारच्या निर्णयावर दिली प्रतिक्रिया
Buldhana मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला असून, कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना कायद्यात बसणारे आरक्षण देण्यात आले आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाचा हक्क अबाधित ठेवून मराठा समाजाला न्याय देण्यात आला आहे. काँग्रेसने मात्र ओबीसी समाजाची फसवणूक केल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी केली.
बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. आठवले म्हणाले की, “मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या लढ्याला यश आले असून, मोठ्या काळानंतर मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षण मिळाले आहे. आतापर्यंत जे मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले त्यांना आरक्षण देता आले नाही; ते मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.”
Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धवसेनेत मंथन
रिपाइं (आठवले गट) महायुतीतील घटक पक्ष म्हणून सक्रिय असल्याचे सांगून आठवले म्हणाले की, “माझ्यावर मंत्रीपदाची जबाबदारी आहे, कार्यकर्ते खुश आहेत; पण कार्यकर्त्यांना देखील सत्ता संरचनेत स्थान मिळाले पाहिजे. आगामी काळात रिपाइंला दोन तरी महामंडळांचे अध्यक्षपद मिळावे, अशी अपेक्षा आहे आणि याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे.”
CM assurance : ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, तुम्ही मागणी करा, शक्य तेवढं देत जाऊ
दलितांवरील अत्याचार थांबवण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेसला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, रिपाइं (आठवले गट) राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम, विदर्भ संपर्कप्रमुख बाबासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.








