Local Body Election : महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष; ओबीसी, एससी, एसटी आरक्षणानंतर बदलणार समीकरण

Political equation to change after the Mayor’s reservation : २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच आरक्षण कायम राहणार का? की रोटेशन पद्धतीनुसार मोठे बदल होणार?

Amravati महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांचे लक्ष प्रभाग आरक्षणावर केंद्रित झाले आहे. २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच आरक्षण कायम राहणार का? की रोटेशन पद्धतीनुसार मोठे बदल होणार? या प्रश्नाने इच्छुकांची झोप उडाली आहे.

प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली आहे. यंदा २०१७ चीच प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली असून, फक्त प्रभाग ६ व ७ मध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत. तसेच प्रभाग ११, १२ आणि १८ यांच्या सीमांत सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे बहुतेक ठिकाणी विद्यमान समीकरणे अबाधित राहिली आहेत. मात्र, प्रत्यक्ष राजकीय गणितावर अंतिम परिणाम आरक्षण घोषणेवरच होणार आहे.

Balen Shah : नेपाळमध्ये सत्तांतर; रॅपर बालेन शाह नवे पंतप्रधान !

आरक्षणाबाबतची उत्सुकता उमेदवारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत वाढली आहे. काही प्रभागांमध्ये महिला, अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण कायम राहील की बदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०१७ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच प्रभाग रचना बदलल्याने अनेक दिग्गजांना आरक्षणामुळे प्रभाग बदलावे लागले होते. यावेळीही असेच घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काही दिवसांत राज्य शासनाकडून आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध होईल, त्यावरच निवडणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

Chandrashekhar Bawankule : ..तर रोहित पवारांनी राजकीय सन्यास घ्यावा !

गत निवडणुकीत प्रभागांमध्ये खुला गट (पुरुष व महिला), ओबीसी आणि एससीसाठी जागा राखीव होत्या. तेच आरक्षण कायम राहणार की रोटेशननुसार बदल होणार, याची उत्सुकता आहे. या वेळीही अनुसूचित जातीसाठी १५ आणि अनुसूचित जमातीसाठी २ जागा निश्चित असतील. मात्र, सर्वांचे लक्ष महापौर पदाच्या आरक्षणाकडे लागले आहे. याबाबतची घोषणा होताच राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे.