ST announcement : एसटी महामंडळाची घोषणा, ७५ बसस्थानकांवर मोफत वाचनालय

A special gift for Prime Minister Narendra Modi on his 75th birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त खास भेट

Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) एक लोकाभिमुख उपक्रम जाहीर केला आहे. राज्यातील प्रमुख ७५ बसस्थानकांवर सर्वसामान्य नागरिकांसाठी “मोफत वाचनालय” सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

या वाचनालयांमध्ये मराठी भाषेतील दिग्गज साहित्यिक व कवींची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर – कुसुमाग्रज, कवी नारायण सुर्वे, पु. ल. देशपांडे यांसारख्या नामवंत लेखकांच्या पुस्तकांचा समावेश असेल. तसेच नामदेवराव ढसाळ, भालचंद्र नेमाडे, शंकर पाटील, व. पु. काळे, विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्याही वाचकांना मोफत वाचनासाठी मिळतील.

ZP Presidents Reservation : राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर !

सर्वसामान्य नागरिक संबंधित बसस्थानकावरील एसटी कर्मचाऱ्यांकडे नोंद करून पुस्तके घरी घेऊन जाऊ शकतात. वाचन पूर्ण झाल्यावर ती पुस्तके परत जमा करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग संदर्भातील मौलिक ग्रंथ देखील या वाचनालयात असतील. स्थानिक वृत्तपत्रेही दररोज उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

Bomb threat : शुक्रवार पवित्र, हायकोर्ट उडवणार”

मंत्री सरनाईक म्हणाले, “हा उपक्रम हा विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजप नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून साकारला जात आहे. बसस्थानक परिसरात वाचन कट्टा निर्माण करून मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे नेण्याचा आमचा उद्देश आहे.”

Sudhir Mungantiwar : अपघातग्रस्तांसाठी तात्काळ धावून आले आ. सुधीर मुनगंटीवार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एसटी महामंडळ विविध लोकाभिमुख उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठी साहित्याचा प्रचार-प्रसार करणारे हे वाचनालय जनतेला भेट म्हणून दिले जाणार आहे. १७ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या उपक्रमामुळे एसटीच्या बसस्थानकावर साहित्यिक वारसा आणि वाचन संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे.

____