Congress Leader Vijay Wadettiwar Questions Maratha Leader Manoj Jarange : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल
Nagpur : विदर्भाच्या विविध संघटनांमध्ये काम करणारे आणि ओबीसी चळवळीत ज्यांचा सक्रीय सहभाग राहिलेला आहे, अशा लोकांची बैठक आज (१३ सप्टेंबर) बोलावली आहे. उद्या निघणाऱ्या मोर्चाची तयारी काय असावी, त्यासाठी ही बैठक महत्वाची आहे. चर्चा करून अगदी गावपातळीवरील ओबीसी नेते आपल्यावर कसा अन्याय होतो आहे, हे घरोघरी जाऊन सांगतील. ओबीसीचं या सरकारनं कसं वाटोळं केलं, हे सांगतील. ती माहिती आजच्या बैठकीत दिली जाणार आहे, असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
नागपुरात आज वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, प्रत्येक गावातून ओबीसी या मोर्चामध्ये सहभागी होईल, असे नियोजन आजच्या बैठकीत ठरवायचे आहे. छगन भुजबळ यांना नेपाळला नेऊन सोडा, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. पण भुजबळ यांना कुठे जायचे आहे, किंवा सोडायचे आहे, हे सांगणारे जरांगे कोण आहेत? ओबीसी चळवळीत जो जो काम करत आहे, त्या प्रत्येकाला जर विदेशात पाठवायचे आहे, तर काय महाराष्ट्रात जरांगे एकटेच राहणार आहेत का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
Reservation controversy : मराठा आरक्षणामुळे ओबीसींना धक्का बसणार नाही’!
आपल्या हक्कासाठी काहीही मागणं हा ओबीसींचा अधिकार आहे. मराठ्यांनी जेव्हा आंदोलन केलं, तेव्हा कुण्याही ओबीसी नेत्याने असे वक्तव्य केले नाही. त्यामुळे यासंदर्भात वैयक्तिक टिका करणं जरांगे यांनी टाळलं पाहिजे. छगन भुजबळ यांनी हे टाळलं पाहिजे. ओबीसी चळवळीत सक्रीय असलेला तरुण भरत कराड याने आत्महत्या केली. तो गरीब होता, ऑटोरिक्षा चालवत होता. पण आपल्या समाजबांधवांसाठी लढत होता. ओबीसीच्या प्रत्येक बैठकीला तो हजर राहात असे.
Pressure for contract : राजकारण्यांच्या जवळच्या कंत्राट देण्यासाठी दबाव, पण..
सरकारच्या नव्या जीआरमुळे त्यांने जीवनयात्रा संपवली. मी येत्या दोन दिवसांत भरतच्या घरी भेटायला जाणार आहे. त्याचे बलीदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. पण या लढ्यामध्ये कुणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले. सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा हा बळी आहे, असा आरोपही त्यांनी केला. सरकारने भरतच्या कुटुंबीयांना मदत केली पाहिजे, असेही ते म्हणाले.








