Belura villagers stage a protest over road and water issues : तहसील कार्यालयासमोर महिलांचा संताप, तहसीलदारांना निवेदन
Khamgao तालुक्यातील बेलुरा गावातील रस्ता व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. १२ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थांनी तहसील कार्यालय व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागासमोर हंडा बजाव आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
बेलुराला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. रस्त्यासाठीचे भूसंपादन अद्याप मार्गी न लागल्याने मंजुरी असूनही काम थांबले आहे. या रस्त्याला ना. आकाश फुंडकर यांनी विधानसभेतून मंजुरी मिळवून दिली होती, तसेच कासारखेड–बर्डी (ज्ञानगंगापूर) रस्ता ठरावही मंजूर झाला आहे. मात्र प्रत्यक्षात कामाची गती शून्य असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
Reservation controversy : बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या, १५ सप्टेंबरला महामोर्चा
रस्त्याबरोबरच बारमाही पाण्याची टंचाई ही गावकऱ्यांसाठी गंभीर समस्या ठरली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दररोज त्रास सहन करावा लागत असून, शासन व लोकप्रतिनिधींनी या मागण्या वारंवार पायदळी तुडवल्याचा आरोप करण्यात आला.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचे प्रयत्न, चंद्रपुरात लवकरच गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र
आंदोलनादरम्यान महिलांनी हंडे वाजवत तहसील कार्यालय गाठले व तहसीलदार सुनिल पाटील यांना निवेदन सादर केले. या वेळी सतीष इंगळे, विनायक वाकोडे, सुरेश जाधव यांच्यासह महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.








