Nitin gadkari : गडकरींना सहा महिन्यांसाठी दुबईला एक्सपोर्ट करा !

Dubai Princes request to Modi, the story takes on a political tone : दुबईच्या प्रिन्सची मोदींकडे मागणी, किस्सा राजकीय रंगात

New Delhi : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कामासाठी प्रसिद्ध आणि स्वभावानेही प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. ‘हायवे मॅन’ ही त्यांची ओळख आता केवळ भारतापुरती मर्यादित नाही, तर ती दुबईच्या राजघराण्याच्या नजरेतूनही सुटलेली नाही. गडकरींनी नुकत्याच झालेल्या एका सभेत सांगितलेला किस्सा सध्या चर्चेत आहे.

गडकरींनी सांगितले की, हैदराबाद हाऊस येथे झालेल्या बैठकीत दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनोदाने म्हणाले, “आमच्यावर एक उपकार करा. गडकरींना सहा महिन्यांसाठी दुबईला एक्सपोर्ट करा.” या वक्तव्याने संपूर्ण बैठक हसत बुडाली होती. नंतर प्रिन्सनी त्यांना दिल्लीतील एका हॉटेलमध्ये खास भेटीसाठीही बोलावले होते.

Harshawardhan Sapkal : देवेंद्र फडणवीस यांनी पापाची कबुली द्यावी !

या किस्स्यादरम्यान गडकरींनी आपल्या कामगिरीचा आढावा घेतला. “देशातील प्रत्येक गावात, जिल्ह्यात रस्त्यांची चर्चा होते. अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा कुठेही जा, लोक म्हणतात की रस्त्यांची स्थिती खूप सुधारली आहे. इतकंच नव्हे तर ऑटो ड्रायव्हर सुद्धा रस्त्यांचं कौतुक करतात. आमच्या विभागाने आतापर्यंत सात ते नऊ वर्ल्ड रेकॉर्ड केलेत,” असा दावा त्यांनी केला.

Maharashtra politics : उद्धव ठाकरे नव्हे, फडणवीसांचा मित्रपक्षांनाच इशारा !

गडकरींच्या या किस्स्याला राजकीय अंगानेही रंग चढला आहे. विरोधक चिमटा काढत म्हणतात की, “दुबईलाच नाही, तर दिल्लीतील सत्तेच्या गलियार्‍यांनाही गडकरींची कार्यतत्परता अधूनमधून ‘एक्सपोर्ट’ झाल्यासारखीच दिसते. निर्णय कुठे घेतले जातात आणि गडकरी कुठे थांबले आहेत, हे नेहमी स्पष्ट होत नाही.” तर भाजपच्या गोटात मात्र हा किस्सा गडकरींच्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली दखल मानली जात आहे. प्रिन्सने केलेला हा गमतीदार उल्लेख गडकरींच्या लोकप्रियतेचं उदाहरण ठरला.