Sudhir Mungantiwar : “सुधीरभाऊ मी आणि आरपीआय कायम तुमच्या सोबत”

Athawales gratitude for Barrister Khobragades postage stamp : बॅरिस्टर खोब्रागडेंच्या टपाल तिकिटावरून आठवले यांची कृतज्ञता

Mumbai : ‘ सुधीरभाऊ, तुम्हाला आरपीआय किंवा माझ्या वतीने सहकार्य लागले तर आम्ही सदैव तयार आहोत.’ अशा शब्दात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त, त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी एक टपाल तिकीट काढण्याचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला होता. याबद्दल आठवण यांनी ही कृतज्ञता व्यक्त केली.

राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र व आंबेडकरी चळवळीचे प्रभावी नेतृत्व करणारे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल तिकीट प्रकाशित करण्यात यावे. याबाबतचे निवेदन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यमान सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे सादर केले. या निवेदनावर सकारात्मक भूमिका घेत घेतली.*

Sudhir Mungantiwar : कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित मानधन द्या !

हा प्रस्ताव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मानसपुत्र, विधीक्षेत्रातील विद्वान आणि आंबेडकरी चळवळीचे प्रभावी नेतृत्व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला व समतेच्या मूल्यांना एक सन्मानपूर्वक अभिवादन आहे, अशी भावना आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल मल्टीपरपज सोसायटी, चंद्रपूरचे सचिव श्री. प्रतीक डोर्लीकर यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल तिकीट प्रकाशनासंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांना विनंती केली होती.आ. मुनगंटीवार यांनी तातडीने या मागणीची दखल घेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यावर सकारात्मकता दर्शवत त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले.

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त टपाल तिकीट प्रकाशित होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. “या प्रकाशनाद्वारे त्यांच्या समतेच्या लढ्याला आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या अविरत व्रताला एक नम्र अभिवादन अर्पण केले जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tribhasha Sutra : शाळांमध्ये त्रिभाषा कोणत्या इयत्तेपासून?

यासंदर्भात आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी समाज माध्यमावरे पोस्ट करा मांडले आहे की “सुधीरभाऊ, तुम्हाला आरपीआय किंवा माझ्या वतीने आणखी काही सहकार्य लागले तर आम्ही सदैव तयार आहोत.” बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने, त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी एक टपाल तिकीट काढण्याचा प्रस्ताव मा. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला आणि मा. आशिष शेलार यांनी सकारात्मकतेने कार्यवाही सुरु करण्याचे हि आदेश दिल्याची माहिती समाज माध्यमातून समजली त्यांचा २५ सप्टेंबर 2025 रोजी जन्मशताब्दी आपण साजरी करत आहोत. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा सामाजिक न्याय आणि समतेच्या लढ्याला उजाळा देणाऱ्या या स्तुत्य उपक्रमासाठी सुधीर आप मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांचे मनःपूर्वक आभार.