व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पचा भारतावर नवा प्रहार, विद्यार्थ्यांचे स्वप्न धुसर !

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पचा भारतावर नवा प्रहार, विद्यार्थ्यांचे स्वप्न धुसर !

Visa fee charged is as much as $100,000 :व्हिसा शुल्क केले तब्बल १ लाख डॉलर

Washington : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एच -1B व्हिसा प्रक्रियेत मोठे बदल जाहीर करत भारतीय उमेदवारांसमोर मोठा अडथळा उभा केला आहे. नव्या नियमांनुसार, आता एच -1B व्हिसासाठी अर्ज करताना तब्बल १ लाख अमेरिकी डॉलर (सुमारे ८३ लाख रुपये) शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे अमेरिकेत उच्च शिक्षण आणि नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो भारतीय तरुणांच्या आशा धुसर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आतापर्यंत कंपन्यांना लॉटरी नोंदणीसाठी २१५ डॉलर आणि अर्जासाठी ७८० डॉलर शुल्क द्यावे लागत होते. परंतु आता झालेल्या प्रचंड वाढीमुळे विशेषतः लहान कंपन्यांना परदेशी कर्मचाऱ्यांची भरती करणे अत्यंत महागडे ठरणार आहे.

व्हाईट हाऊसचे कर्मचारी सचिव विल शार्फ यांनी सांगितले की, “एच -1B व्हिसा प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. कमी पगारात परदेशी कामगार घेऊन स्थानिक कर्मचाऱ्यांना डावलले जाते. त्यामुळे आता फक्त अत्यंत कौशल्यवान व्यक्तींनाच संधी मिळावी, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.”

Ajit Pawar : अजित पवारांचा इशारा मंत्रिपदासाठी कामगिरी दाखवा !

2024 मध्ये एच -1B व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या आधीच ४० टक्क्यांनी घटली होती. कारण एकाच उमेदवाराकडून अनेक अर्ज करण्यास बंदी घालण्यात आली. यावर्षीही अर्जांची संख्या घटण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत सर्वाधिक एच -1B व्हिसा धारक कॅलिफोर्नियामध्ये आहेत. अर्ज करणाऱ्या कंपन्यांमध्ये ॲमेझॉन आघाडीवर असून, त्यानंतर टीसीएस, मायक्रोसॉफ्ट, एप्पल आणि गुगल यांचा क्रमांक लागतो.

Gopichand padalkar : जयंत पाटलांवर पडळकरांची गलिच्छ टीका !

दरम्यान, अमेरिकेतील कामगार संघटना ए एफ एल – सी आय ओ ने या निर्णयाचे स्वागत केले असून, उच्च वेतन देणाऱ्या कंपन्यांना व्हिसा प्राधान्याने द्यावा, अशी मागणी केली आहे. मात्र भारतीय विद्यार्थ्यांसाठी आणि मध्यमवर्गीय उमेदवारांसाठी हा नियम मोठा आर्थिक अडथळा ठरणार आहे.

विशेषतः अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आता ‘स्वप्नांची भूमी’ अधिक महागडी आणि मर्यादित होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

____

error: Content is protected !!