व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Gopichand padalkar : जयंत पाटलांवर पडळकरांची गलिच्छ टीका !

Gopichand padalkar : जयंत पाटलांवर पडळकरांची गलिच्छ टीका !

Sharad Pawar directly called Fadnavis and registered his protest : शरद पवारांनी थेट फडणवीसांना फोन करत नोंदवला निषेध

Mumbai : सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर गलिच्छ शब्दांत टीका केली. या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी भाजपसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

पडळकर यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. “अशा प्रकारची गलिच्छ टीका करणे योग्य नाही,” असे सांगून पवारांनी फडणवीसांना सुनावले. तसेच, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा आपण निषेध करतो, असेही पवारांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पडळकर यांच्या सातत्याच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि गलिच्छ वक्तव्यांमुळेही राज्याचे वातावरण तापले आहे. सांगलीसह परिसरात पडळकर यांच्या विरोधात जोरदार आंदोलनेही सुरू झाली आहेत.

Reservation control : जरांगे समर्थकांना ओबीसींनी धडा शिकवला पाहिजे !

पडळकरांनी आपल्या भाषणात जयंत पाटील यांच्यावर थेट वैयक्तिक हल्ले चढवले. “जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसांनी तो किती बिनडोक आहे हे सिद्ध करतोय. जयंत पाटलांनी मला एका कंत्राटदाराच्या आत्महत्येच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण मी प्रस्थापितांच्या सत्ताकारणामध्ये दोन-दोन महिने जेलमध्ये जाऊन आलोय. जयंत पाटलांचे काम फक्त मला बदनाम करण्याचे आहे. मात्र गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही,” असे वक्तव्य करत त्यांनी वादाला अधिक खतपाणी घातले.

Heavy rains hit : अतिवृष्टीत शेतपिकांचे मोठे नुकसान, पंचनाम्याचे सुरू !

इतकेच नव्हे तर पडळकरांनी पाटलांच्या वंशावळीवरही प्रश्न उपस्थित करत “हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार, काहीतरी गडबड आहे,” अशी अतिशय खालच्या पातळीवरची टीका केली. या वक्तव्यावरून पडळकरांचा विरोधकांकडून तीव्र निषेध होत असून राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

error: Content is protected !!