Farmers in the state distressed due to excessive rainfall, heavy crop damage : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मनसेची मागणी
Chikhali : राज्यात अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लाखो हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, शेकडो जनावरे दगावणे आणि जमिनी खरडून जाणे या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीची मदत न मिळाल्यास राज्यात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दिला आहे.
बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात मनसेने म्हटले आहे की, राज्यातील ५० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, भुईमूग, मका, ज्वारी, भाजीपाला व फळपिके अतिवृष्टीच्या फटक्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या आपत्तीमुळे १०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत.
Dhananjay Munde : धनंजय मुंडे म्हणाले, हाताला काम द्या; जरांगेचा पलटवार
मनसेच्या मागण्या :
राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.
जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टर १ लाख, बागायत पिकांसाठी १.५ लाख, तर फळपिकांसाठी २ लाख रुपयांची मदत द्यावी.
प्रत्येक मृताच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत व एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी.
म्हैस, गाय, बैल, घोडा इत्यादी जनावरांच्या मृत्यूबदल्यात ७५ हजारांची मदत मिळावी.
जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर १ लाख रुपयांची मदत द्यावी.
घरे पडलेल्या नागरिकांना घरकुल योजनेतून पक्की घरे तातडीने उपलब्ध करून द्यावीत.
मनसेने स्पष्ट केले की, या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पेटवले जाईल.
Match Controversy : पाकड्यांनी भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच त्याच्या कृतीतून…,
निवेदन सादर करतेवेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, तालुकाध्यक्ष अमोल रिंढे, नांदुरा तालुकाध्यक्ष भागवत उगले, मोताळा तालुकाध्यक्ष अमोल गोरे, शहराध्यक्ष नारायण देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








