Ownership of two plots rests with the Akola Municipal Corporation : प्रस्ताव रखडला होता, कमर्शियल कॉम्प्लेक्सचा मार्ग मोकळा
Akola शहराच्या मध्यवर्ती भागातील जनता भाजी बाजार व टॉवर चौक येथील जुने बसस्थानक ही दोन्ही महत्त्वाची भूखंडे महापालिका प्रशासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे संबंधित जागांवर कमर्शियल कॉम्प्लेक्स व इतर विकासकामांचा मार्ग मोकळा झाला असून, तो महापालिकेसाठी दिलासादायक ठरणार आहे.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करून आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी २०२१ मध्ये निवडक आरक्षित जागांवर व्यावसायिक संकुले उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. शहरातील अनेक ठिकाणी अशा व्यावसायिक संकुलांमुळे महसूल मिळत असून, याच धर्तीवर जनता भाजी बाजारच्या जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्स व जुने बसस्थानकाच्या जागेवर सिटी बसस्थानकासह वाणिज्य संकुल उभारण्याचे आरक्षण आहे.
District Co-operative Bank : विरोधकांकडून जिल्हा बँकेची नैराश्यातून बदनामी
या दोन्ही भूखंडांच्या हस्तांतरणासाठी तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे २६ कोटी २० लाख रुपये शुल्क अदा केले होते. मात्र, शासनदरबारी प्रस्ताव रखडला होता. अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुने शुल्क ग्राह्य धरून जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे २६ कोटी २० लाख रुपये जमा केले होते. मात्र, त्याविरोधात काही तक्रारी शासनाकडे दाखल झाल्या होत्या. तसेच, तत्कालीन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मनपाला तब्बल १४८ कोटी रुपये शुल्क भरण्याचे पत्र दिले होते. या सर्व वाद बाजूला सारत शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे महापालिकेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
Road repair : राज्यातील रस्त्यांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी ₹१२९६ कोटीं
भूखंडांचा तपशील
जुने बसस्थानक
आरक्षण : वाणिज्य संकुल व सिटी बसस्थानक
एकूण क्षेत्रफळ : १,०४,०७५ चौ. फूट
जनता भाजी बाजार
आरक्षण : वाणिज्य संकुल
एकूण क्षेत्रफळ : २,४०,००० चौ. फूट








