Amravati Teachers Constituency : शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची जोरदार मोहीम

BJP’s vigorous campaign for the teachers’ constituency : यावेळीही अकोल्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी

Akola अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघावर पकड मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार मोहीम हाती घेतली असून, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षाने नियोजनबद्ध तयारी सुरू केली आहे. या तयारीचा भाग म्हणून अमरावती येथे झालेल्या बैठकीत जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला.

या बैठकीस महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ना. चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश महासचिव विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, मंत्री आकाश फुंडकर उपस्थित होते.

भाजपने बूथस्तरावरील जनसंपर्क मोहिमेची रणनीती आखली असून, ती निवडणूक आयोगाच्या ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शिक्षक मतदार नोंदणी मोहिमेशी सुसंगत असेल. प्रत्येक पात्र आणि मान्यताप्राप्त शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवून पक्षाने शाळा व महाविद्यालयांत कार्यरत शिक्षकांची नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

DPC Meeting : ठाकरे सेना धडकली जिल्हाधिकारी कार्यालयावर!

या बैठकीचे आयोजन अमरावती शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे आणि माजी मंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. बैठकीस पश्चिम विदर्भातील सर्व मंडलाध्यक्ष, जिल्हास्तरीय निवडणूक प्रमुख, अध्यक्ष- महासचिव, दहा संघटनात्मक जिल्ह्यांतील राज्यस्तरीय पदाधिकारी, विद्यमान व माजी आमदार, खासदार तसेच निवडक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

OBC Reservation : आत्महत्येच्या वाटेला जाऊ नका, आरक्षणासाठी लढू

 

महायुतीत संघर्ष अटळ

या मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकून अलीकडेच शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे या जागेवर शिवसेना जोरदार दावा करणार असून, भाजपने जागा न सोडल्यास महायुतीत संघर्ष टाळता येणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

पश्चिम विदर्भात भाजपची ही पहिली मोठी संघटनात्मक मोहीम मानली जात असून, प्रत्यक्षात निवडणूक प्रचाराची सुरूवात झाल्याचे भासते. मागील निवडणुकीत भाजपने डॉ. नितीन धांडे यांना उमेदवारी दिली होती; मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.