New rules : नवा महिना, नवे नियम, आजपासून मोठे बदल लागू

Direct impact on railway bookings, investments, digital payments, gaming : रेल्वे बुकिंग, गुंतवणूक, डिजिटल पेमेंट गेमिंगवर थेट परिणाम

Mumbai: १ ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक मोठे बदल लागू झाले आहेत. रेल्वे प्रवास, पेन्शन गुंतवणूक, डिजिटल व्यवहार आणि ऑनलाईन गेमिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये हे बदल झाले असून त्याचा थेट परिणाम घरगुती बजेट आणि व्यवहार पद्धतींवर होणार आहे.

आयआरसीटीसी वर तिकीट बुकिंग सुरू होताच एजंट आणि दलाल मोठ्या प्रमाणात तिकिटे बुक करून सामान्य प्रवाशांना अडचणीत आणत होते. पण आता १ ऑक्टोबरपासून पहिल्या १५ मिनिटांत एजंट तिकीट बुक करू शकणार नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळण्याची संधी अधिक वाढणार आहे.

Establishment of Shiv Sena : शिवसेनेचा नाही पण उद्धव-राज युतीचा मुहूर्त !

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली मध्ये नवीन मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क लागू करण्यात आले आहे. बिगर सरकारी कर्मचारी, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गिग वर्कर्स आता एका पॅन नंबरद्वारे अनेक पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील. यामुळे गुंतवणूकदारांना आपल्या सोयी आणि जोखीम क्षमतेनुसार योग्य पर्याय निवडता येईल.

यूपीआय वापरकर्त्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. १ ऑक्टोबरपासून एम पी सी आय ने “रिक्वेस्ट फॉर मनी” फीचर बंद केले आहे. याचा वापर अनेकदा फसवणूक आणि फिशिंगसाठी होत होता. आता गुगल पे, फोनपे, पेटीएमसारख्या ॲपवर कोणीही पैसे मागण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही. त्यामुळे डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत.

RBI MPC Meeting : आरबीआयचे रेपो दर जैसे थे!

वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन गेमिंग क्षेत्रात फसवणूक आणि बनावट ॲप्स वाढल्यामुळे सरकारने नवे नियम लागू केले आहेत. १ ऑक्टोबरपासून गेमिंग कंपन्यांवर कडक देखरेख ठेवली जाणार असून खेळाडूंना सुरक्षित आणि पारदर्शक प्रणाली मिळणार आहे. फसवणूक करणाऱ्या व बनावट गेमिंग ॲप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. या सर्व बदलांचा थेट परिणाम तुमच्या प्रवास, व्यवहार, गुंतवणूक आणि मनोरंजन यावर होणार आहे.

___