Cyclone Shakti : ‘शक्ती’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर मोठा धोका!

 

Heavy rain, gusty winds warning : मुसळधार पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा

Mumbai: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने तीव्र रूप धारण करत आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा आकार घेतला आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना मोठा धोका निर्माण झाला असून, हवामान विभागाने 7 ऑक्टोबर पर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसाच्या सरी थांबण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. नवरात्र संपून दिवाळीचे वेध लागले असताना हवामानाचा लहरीपणा कायम राहिला आहे. या पार्श्वभूमीवर ‘शक्ती’ चक्रीवादळाने परिस्थिती आणखी गंभीर केली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, ‘शक्ती’ चक्रीवादळ द्वारकाच्या पश्चिमेस सुमारे 340 किमी अंतरावर केंद्रित होते. हे वादळ पश्चिम-दक्षिणपश्चिम दिशेने सरकत असून 4 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 5 ऑक्टोबरपर्यंत हे वादळ उत्तर आणि मध्य अरबी समुद्राच्या मध्य भागात पोहोचेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Crime in Amravati : शोधायला गेले बिश्नोई गँगचा शार्प शूटर; निघाला गरीब व्यावसायिक!

या चक्रीवादळाचा थेट परिणाम मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांवर होण्याची शक्यता असून, 5 ऑक्टोबर पर्यंत या भागांमध्ये 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. काही ठिकाणी हा वेग 65 किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर अनावश्यकपणे न पडण्याचा आणि मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

Dhangar reservation : एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी धनगर समाजाचा रास्ता रोको

‘शक्ती’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. फक्त किनारपट्टीच नव्हे तर पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांतही पावसाचा जोर वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

Gram Rozgar Sahayak : जी.आर. काढूनही अंमलबजावणी नाही; ७ महिन्यांचे मानधन थकले

सध्या महाराष्ट्रावर तिहेरी हवामान संकट निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरासोबतच अरबी समुद्रातही आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने देशातील 14 राज्यांना हाय अलर्ट जारी केला असून, त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

____