व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Gadchiroli ashram school snake bite incident : जपतलाईतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची जबाबदारी...

Gadchiroli ashram school snake bite incident : जपतलाईतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करा

Fix responsibility for the deaths of three girl students at the Ashram school : राज्यातील सर्व आश्रमशाळा, वसतिगृहांचे १५ दिवसांत सामाजिक सर्वेक्षण करण्याची मागणी

Akola गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून, याची त्रयस्थ यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे आणि छात्रालयांचे १५ दिवसांत सामाजिक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे ई-मेलद्वारे केली आहे.

९ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात ७९ विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या होत्या. त्यापैकी सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाला. दीपिका लाकडा, सुष्मिता मांडल आणि अनु कोरेटी या तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे पातोडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

ही घटना केवळ दुर्दैवी अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा, निवास व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि प्रशासनाची कार्यक्षमता याबाबत या घटनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

Ambadevi–Ekvira Devi temples : अंबादेवी-एकवीरा देवी मंदिरांसाठी ४१० कोटींचा विकास आराखडा

सुविधांची तपासणी करण्याची मागणी

सामाजिक सर्वेक्षणात इमारतींची सुरक्षितता, वीज व्यवस्था, स्वच्छता, साप-विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांपासून संरक्षण, विद्यार्थ्यांची निवास क्षमता, खाटा व झोपण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आहार व पोषण, वैद्यकीय सुविधा, औषधसाठा, आपत्कालीन उपचार व्यवस्था, शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपलब्धता तसेच शैक्षणिक सुविधांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा प्रत्यक्ष वापर झाला आहे की नाही, याचीही तपासणी करावी. सर्वेक्षण केवळ कागदोपत्री न करता विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून करावे. यापूर्वी प्राप्त तक्रारी आणि त्यावर प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचीही पडताळणी करावी, असे पातोडे यांनी म्हटले आहे.

High court decision : पिणाऱ्यांना ‘जोर का झटका’! रम-व्हिस्कीच्या चवीमागचं गुपित उघड !

गंभीर त्रुटी आढळलेल्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करून, धोकादायक वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार सुरक्षित पर्यायी निवास उपलब्ध करून द्यावा. प्रत्येक आश्रमशाळेत सर्पदंश, आग, विद्युत अपघात आणि अन्य आपत्कालीन परिस्थितींसाठी २४ तास वैद्यकीय व प्रतिसाद व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची मागणी

जपतलाई दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत आणि पुनर्वसनाची व्यवस्था करावी. जखमी विद्यार्थिनींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, अशी मागणी पातोडे यांनी केली आहे.

The Cockroach Janta Party : एबीसीडी शिकायला दोन लाख रुपये?, कॉक्रोच जनता पार्टीने घेतलं मनावर

साप वसतिगृहात कसा शिरला, विद्यार्थिनी जमिनीवर का झोपत होत्या, सुरक्षा व्यवस्थेत कुठे त्रुटी राहिल्या, निधीचा वापर कसा झाला आणि यापूर्वीच्या तक्रारींवर कोणती कार्यवाही करण्यात आली, याची माहिती जनतेसमोर आणावी. या प्रकरणाची चौकशी त्रयस्थ आणि निष्पक्ष यंत्रणेमार्फत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दोषींवर कारवाई झाली नाही आणि राज्यातील आश्रमशाळांचे तातडीने सामाजिक सर्वेक्षण करण्यात आले नाही, तर विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या हक्कांसाठी वंचित बहुजन आघाडी लोकशाही मार्गाने ‘जवाब दो’ आंदोलन उभारेल, असा इशाराही पातोडे यांनी दिला.

error: Content is protected !!