Hotel Manager Booked Under Atrocities Act for Denying Room : पोलिसांची कारवाई, पंचशील ध्वजाकडे बघून खोली नाकारल्याचा आरोप
Akola मुंबई येथून धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी अकोल्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांना हॉटेल रायजिंग सनमधील मॅनेजरने रूम देण्यास नकार देऊन अपमान केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी मॅनेजरविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
घटना सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन हद्दीतील मध्यवर्ती बसस्थानकालगत असलेल्या हॉटेल रायजिंग सन येथे घडली. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबईहून आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी राहण्यासाठी रूम मागितली होती. सुरुवातीला हॉटेल व्यवस्थापनाने रूम देण्यास तयारी दर्शविली, मात्र त्यांना दलित समाजातील असल्याचे समजल्यानंतर मॅनेजरने रूम देण्यास नकार दिला, असा आरोप करण्यात आला आहे.
Flood-Affected Farmers : शासन निष्क्रीय, शेतकऱ्यांबद्दल उदासीन, काँग्रेसची टीका
पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या हातात असलेल्या पंचशील ध्वजाकडे पाहिल्यानंतर मॅनेजरने टाळाटाळ केली आणि शेवटी रूम नाकारली. या प्रकारामुळे झालेल्या अपमानानंतर त्यांनी थेट सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली.
Sonam Wangchuk case : सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध — अकोल्यात निघाला भव्य कॅन्डल मार्च!
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक मालती कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.








