Local body junction : महायुतीची रणनिती स्थानिक समित्या करणार ‘ग्राउंड रिपोर्ट’ :

Fadnavis-Shinde-Ajit Pawar ready for upcoming elections : फडणवीस- शिंदे-अजित पवार आगामी निवडणुकीसाठी सज्ज

Mumbai: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणुकांचा बिगुल वाजत आहे. ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुका दिवाळीनंतर — म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीने आधीपासूनच निवडणूक रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार या तिघांनी मिळून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा इलेक्शन प्लॅन तयार केला आहे. महायुती एकत्र येऊन सत्ता टिकवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, ठाकरे गट आणि महाविकास आघाडी या चक्रव्यूहाला कसा भेदतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Shivsena protest : तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याचे वावडे का?, शिवसेनेचा सवाल

प्राप्त माहितीनुसार, महायुतीकडून जिल्हा पातळीवर तीन मंत्र्यांची समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षांचे आमदार व स्थानिक नेते सहभागी असतील. जिल्हा समित्यांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

या समित्यांना पुढील आठ दिवसांत जिल्हावार सविस्तर अहवाल सादर करायचा आहे. या अहवालात जिल्ह्यातील राजकीय स्थिती, महायुतीच्या पक्षांची स्थानिक ताकद, अंतर्गत वादांची माहिती, तसेच निवडणुकीतील संभाव्य समीकरणांवर सखोल विश्लेषण असणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे, ज्या जिल्ह्यांत महायुती अंतर्गत वाद आहेत, त्यावरही समित्या सविस्तर नोंद घेणार आहेत. हा अहवाल राज्यस्तरीय समन्वय समितीसमोर मांडला जाईल. त्यानंतर वादग्रस्त जागांवर अंतिम निर्णय महायुतीचे मुख्य नेते घेतील. राज्यस्तरीय समितीची जबाबदारी असेल की कोणत्याही ठिकाणी जाहीर तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा होणार, याबाबतही सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान नगरपरिषद निवडणुका, तर 15 ते 20 डिसेंबरदरम्यान जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Farmers suicide : “नव नगराची अधिसूचना काढा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या!”

राज्यातील सत्ताधारी महायुती आता या निवडणुकीत एकत्र उतरून स्थानिक पातळीवर वर्चस्व टिकवण्याच्या तयारीत आहे. आगामी काही महिन्यांत राज्यात राजकीय चुरस रंगणार आहे.