BJP Leader Chandrashekhar Bawankule Highlights Uddhav Thackeray’s Political Helplessness : ठाकरेंनी त्यांचा कार्यकाळ काचेच्या घरात घालवला
Nagpur : शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे जवळपास अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यानंतर एकनाथ शिंदे तर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे हतबल मुख्यमंत्री होते. तर फडणवीस हे सक्षम नेतृत्व देणारे नेते आहेत. प्रशासन आणि जनसंपर्क या दोन्ही आघाड्यांवर ते सक्रीय असतात. तर ठाकरे यांचा कार्यकाळ त्यांनी काचेच्या घरात घालवला, असा आरोप राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
राजकारणात नेतृत्व हे केवळ पदावरून नव्हे, तर कृतीतून सिद्ध होते. महाराष्ट्राच्या राजकीय परिदृष्यात ही रेषा अधिक स्पष्ट दिसते आहे. राज्याला व्हीजन २०३५ आणि २०४७ची दिशा देणारे आमचे सरकार केवळ घोषणांवर नव्हे तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवते. शेतकऱ्यांसाठी इतिहासातील सर्वात मोठे ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज महायुती सरकारने दिले आहे. हे सरकारच्या संवेदनशीलतेचे प्रतिक आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
Local Body Elections : नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची सोडत आज !
तो त्यांचा पारिवारीक मामला..
मराठी भाषेच्या मुद्द्यावर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले. सरकारच्या विरोधात त्यांनी मुंबईत मेळावाही घेतला होता. पण आगामी निवडणुकांमध्ये ते एकत्र राहतील की नाही, याबाबत अद्यापही काही स्पष्टता नाही. त्यांच्या भेटीगाठी सध्या वाढलेल्या आहेत. दोन भावांनी एकत्र येणे हा त्यांचा पारिवारीक मामला आहे. दिवाळी सारख्या सणाला कुटुंबाने एकत्र येणे चांगलेच आहे, असे बावनकुळे यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत सांगीतले. कबुतरखान्याच्या वादावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले यासंदर्भात कायद्याला प्राधान्य देत धार्मिक भावना जपली जाईल. शासनाच्या संतुलीत भूमिकेचे हे द्योतक आहे.








