Mahajyoti Training Centre to Be Established in Nashik Too : राज्य सरकारने केली १७४ कोटी रुपयांची तरतूद
Nagpur : राज्याची उपराजधानी नागपूर येथे काल (१९ ऑक्टोबरला) महाज्योतीच्या सात मजली प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर नाशिकमध्येही महाज्योती संस्थेचे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी १७४ कोटी रुपयांची तरदून करण्यात आल्याची घोषणा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली.
महाज्योतीच्या उपक्रामांना आता आणखी विस्तार मिळणार असून नाशिकमध्येही प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्यातील मागासवर्गीय व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि कौशल्यविकासाच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. महाज्योतीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्ष प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण, तसेच व्यक्तिमत्व विकासासारख्या विविध उपक्रमांचा लाभ आता नाशिकमधील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना नवे बळ मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
Namaz at Shaniwarwada : शनिवारवाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल !
या केंद्रामार्फत स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, तांत्रिक शिक्षण व रोजगाराभिमुख प्रशिक्षण यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतील. नाशिकसारख्या शैक्षणिक आणि औद्योगिक शहरात हे केंद्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन आणि आवश्यक संसाधने स्थानिक स्तरावरच उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महाज्योती संस्थेने आतापर्यंत नागपूर, पुणे, अमरावतीसह विविध ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे सुरू करून हजारो विद्यार्थ्यांना संधी दिली आहे.
Mahadevrao Shivankar : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचे वृद्धापकाळाने निधन
नाशिक केंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या निर्णयामुळे सामाजिक न्याय विभागाच्या उपक्रमांना आणखी गती मिळेल आणि ओबीसी समाजातील तरुणांना स्पर्धा परीक्षांमध्ये अधिक सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट साध्य होईल. शिक्षण, प्रगती आणि सामाजिक उन्नती यांचा समतोल साधण्यासाठी हे केंद्र एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असेही मत मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले.








