व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश Prime Minister of Japan : जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय

Prime Minister of Japan : जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय

Sanai Takaichi became the first woman Prime Minister : सनाई ताकाईची बनल्या पहिल्या महिला पंतप्रधान

Tokyo : जपानच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. टोकियो येथे जपानच्या संसदेने अल्ट्राकंजरवेटिव्ह नेत्या सनाई ताकाईची यांची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. ताकाईची यांच्या निवडीमुळे जपानच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून, हे पाऊल आशियाई आणि जागतिक पातळीवर मोठ्या राजकीय घडामोडी म्हणून पाहिले जात आहे.

माजी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी केवळ वर्षभराच्या कार्यकाळानंतर राजीनामा दिल्यानंतर ताकाईची यांची पंतप्रधानपदी निवड झाली. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने (LDP) जुलै 2025 मधील निवडणुकीत पराभवानंतर सत्ता परत मिळवण्यासाठी ओसाका-स्थित जपान इनोव्हेशन पार्टीसोबत युती केली होती. मात्र या युतीला दोन्ही सभागृहात स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, त्यामुळे ताकाईची यांचे सरकार टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

Namaz at Shaniwarwada : शनिवार वाडा शुद्धीकरण मोहिमेमुळे महायुतीत फूट !

सनाई ताकाईची या जपानमधील उजव्या विचारसरणीच्या, राष्ट्रवादी धोरणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नेत्या आहेत. त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात जपानच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणांवर आणि चीनबरोबर वाढत्या तणावावर नियंत्रण ठेवण्यावर भर दिला. “जपानला पुन्हा आर्थिकदृष्ट्या सबळ बनवणे आणि राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे” हा आपला मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी संसदेत जाहीर केले.

Cyber fraud : मी एनआयएचा अधिकारी बोलतोय, तुमचं नाव दहशतवादी हल्ल्यात !

या निर्णयाने जपानमधील महिलांसाठी राजकारणाच्या उच्च पातळीवरील दारे उघडली असल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, चीन आणि उत्तर कोरियासोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ताकाईची यांच्या आक्रमक परराष्ट्र धोरणामुळे आशियाई राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जपानमध्ये पहिल्यांदाच महिला पंतप्रधान पदावर विराजमान झाल्याने देशाच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात ही घटना सुवर्णाक्षरांनी नोंदली जाणार आहे.

____

error: Content is protected !!