Amravati Congress ‘Missing’ from Farmers’ Protest : समर्थन पत्र दिले, पण आंदोलनात उतरलेच नाही
Amravati माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नागपूर येथे झालेल्या महाएल्गार आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने समर्थन दिले होते. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अधिकृत पत्र जारी केले होते. मात्र, या आंदोलनाला अमरावती जिल्हा काँग्रेसचे समर्थन नव्हते, अशी कबुली स्वतः बच्चू कडू यांनी रविवारी दिली.
सध्या जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख आहेत. बच्चू कडू आणि बबलू देशमुख यांच्यात राजकीय तसेच सहकार क्षेत्रात जुनी वर्चस्वाची चुरस असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दोघांमध्ये अनेकदा तणाव निर्माण होतो. त्यामुळे, प्रदेश काँग्रेसने आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी अमरावती जिल्हा काँग्रेसने मात्र ‘कडू’ भूमिका घेतली, अशी कुजबुज बच्चू कडू यांच्या पत्रकार परिषदेनंतर सुरू झाली.
PWD : रस्त्याचे काम केले नाही, ग्रामस्थांनी रस्त्यावरच लावली बेशरमाची झाडे!
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आणि बच्चू कडू यांचा विधानसभा मतदारसंघ एकच असून हे दोन्ही देते निवडणुकीच्या माध्यमातून अनेकदा अमोरासमोर आले आहेत. निवडणूक काळातील कटूता या दोन्ही नेत्यांच्या मध्ये वारंवार जाणवत असून शेतकरी आंदोलन संदर्भात जिल्हा काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमागेही हेच प्रमुख कारण असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळत आहे.








