Doctor suicide case in Phaltan : मेयो, मेडिकलमधील निवासी डॉक्टरही संपावर, ओपीडीसमोर लांबच लांब रांगा !

Resident doctors at Mayo, Medical are also on strike, long queues in front of OPD : फलटण येथील डॉक्टर आत्महत्येच्या घटनेनंतर डॉक्टरांचा संताप उफाळला

Nagpur : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेनंतर राज्यभरात डॉक्टरांच्या संतापाची लाट उसळली आहे. त्याचा थेट परिणाम आता नागपूरच्या मेयो आणि मेडिकल कॉलेजमधील आरोग्य सेवांवर दिसू लागला आहे. या दोन्ही प्रमुख शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संपात सहभाग नोंदवला. त्यामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाली. परिणामी रुग्ण आणि नातेवाईक त्रस्त झाले आहेत.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) येथे निवासी डॉक्टरच रुग्णसेवेचा कणा मानले जातात. हे डॉक्टर रात्रंदिवस रुग्णसेवेत कार्यरत असतात. मात्र तेच संपात सहभागी झाल्याने सर्व विभागांमध्ये गोंधळ उडाला आहे. ओपीडीसमोर रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. काही ठिकाणी उपचारासाठी प्रतीक्षारत रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना तासनतास थांबावे लागले.

cabinet meeting : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारांवर उपचार

संपामुळे कामाचा सर्व भार वरिष्ठ डॉक्टरांवर पडला आहे. पण त्यांची संख्या कमी असल्यामुळे आरोग्य सेवेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. तातडीच्या शस्त्रक्रिया आणि गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर मर्यादित संख्येने असतानासु्द्धा सेवा पुरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. फलटणमधील घटनेत दोषी असलेल्या लोकांवर कठोर कावाई करावी. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस धोरण राबवावे आणि रुग्णालयातील वाढत्या कामाच्या ताणाचे व्यवस्थाप करावे, अशी संपात सहभागी झालेल्या डॉक्टरांची मागणी आहे.

Khamgao APMC : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता संघर्ष तापला!

डॉक्टरांवर होणारा अन्याय, वाढता ताण आणि दबाव आता सहन होणार नाही, असे एका निवासी डॉक्टरने सांगितले. राज्यभरातील निवासी डॉक्टर संघटनांनी एकत्रितपणे टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या फक्त प्रतिकात्मक संप सुरू आहे. मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास अनिश्र्चितकालीन संपाचाही इशारा देण्यात आला आहे.

Local Body Elections : मतदारयादीचा टप्पा पूर्ण; जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीची उलटी गणती सुरू!

दरम्यान रुग्णालय प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रुग्णांवर या संपाचा परिणाम होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही नागपूरसह राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवा विस्कळीत होण्याची शक्यता बळावली आहे. डॉक्टरांचा हा संप फक्त मागण्यांपुरताच मर्यादित न राहता, आरोग्य व्यवस्थेतील गाभ्याच्या प्रश्र्नांकडे लक्ष वेधणारा इशारा ठरण्याचे संकेत मिळत आहेत.