Local Body Elections : थेट नगराध्यक्षांसह १,१२२ सदस्यांसाठी होणार लढत!

Including Direct election for Mayor post, battle for 1,122 members to be held : पश्चिम विदर्भातील ४० नगरपरिषद, ५ नगरपंचायतींमध्ये धुमशान

Amravati पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील ४० नगरपरिषद आणि ५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीत ४५ थेट नगराध्यक्षपदे आणि १,१२२ नगरसेवक पदांसाठी चुरशीच्या लढती रंगणार आहेत.

उमेदवारी अर्ज माघारीनंतर उमेदवारांना फक्त चार दिवसांचा प्रचार कालावधी मिळणार असून, त्यामुळे उमेदवार व पक्षनेत्यांच्या पायाला भिंगरी लागणार आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून या नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये प्रशासक राज्य आहे. दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्याने अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे आपले गड टिकविण्याचे आव्हान स्थानिक नेत्यांसमोर आहे.

Local Body Elections : राज्यातील एकमेव नगरपरिषद, जिथे होणार नाही निवडणूक!

या वेळची निवडणूक प्रक्रिया अवघ्या २९ दिवसांत पूर्ण होणार असल्याने प्रशासनासमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे मुख्याधिकारी, तहसीलदार, एसडीओ, उपजिल्हाधिकारी अशा पदांची अनेक रिक्तता असल्याने निवडणूक तयारीत अडथळे येत आहेत. प्रशासनाने पदोन्नती व बदलीसंबंधीच्या बहुतेक फाईल्स २४ तासांत निकाली काढण्याची तयारी सुरू केल्याचे सूत्रांचे म्हणणे to आहे.

Local Body Elections : भाजपकडून अकोल्यात निवडणूक जबाबदाऱ्यांची घोषणा

जिल्हानिहाय निवडणूक स्थिती

अमरावती: १० नगरपरिषद, २ नगरपंचायती
अकोला: ५ नगरपरिषद, १ नगरपंचायत
बुलढाणा: ११ नगरपरिषद
यवतमाळ: १० नगरपरिषद, १ नगरपंचायत
वाशिम: ४ नगरपरिषद, १ नगरपंचायत