व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Pune land scam: १ टक्के शेअरधारकावर गुन्हा, मग पार्थ पवारांवर का नाही?

Pune land scam: १ टक्के शेअरधारकावर गुन्हा, मग पार्थ पवारांवर का नाही?

Who is Sheetal Tejwani and why is her arrest necessary : शीतल तेजवानी कोण आणि त्यांना अटक का गरजेची?

Pune : राज्याच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा पुत्र पार्थ पवार सध्या चर्चेत आले आहेत. या व्यवहारामुळे केवळ प्रशासन नव्हे तर राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. बाजारभावानुसार सुमारे १८०० कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटींमध्ये पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला मिळाली, असा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातही सर्वात मोठा मुद्दा म्हणजे या व्यवहारात फक्त ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टँप ड्युटी भरल्याचा आरोप. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून, आता या चौकशीचं धागं पार्थ पवारांपर्यंत पोहोचतंय का, हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

या प्रकरणात सध्या शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारु या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र पार्थ पवार हे या अमेडिया कंपनीचे भागीदार असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. या कंपनीत दिग्विजय पाटील यांचा एक टक्का शेअर असल्याचं म्हटलं जातं, तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, पण पार्थ पवारांवर नाही. यामुळे प्रशासनाकडून पार्थ पवारांना ‘क्लीन चीट’ दिली जात आहे का, असा संशय उपस्थित होत आहे.

Local Body Elections : लोणारमध्ये भाजपचे ‘एकला चलो रे’, कार्यकर्त्यांमध्ये आनंद

पोलिसांच्या माहितीनुसार, या व्यवहारात सुमारे ६ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली गेलेली नाही. शीतल तेजवानी यांच्याकडे या जमिनीची पावर ऑफ ॲटर्नी असल्याचं समोर आलं आहे. त्यांनीच जमीन खरेदीचा करार तयार केला आणि अमेडिया कंपनीच्या दिग्विजय पाटील यांनी तो व्यवहार पूर्ण केला. उपनिबंधक रवींद्र तारु यांनी संबंधित कागदपत्र तयार करून दिल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे. या तिघांविरोधात फसवणूक आणि गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तथापि, दस्त नोंदणी अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार ज्या व्यक्तींची नावं आणि सह्या कागदपत्रावर आहेत, त्यांच्याविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे पार्थ पवारांचं नाव तक्रारीत नाही. पण या प्रकरणातील सर्व आर्थिक निर्णय आणि व्यवहारांची साखळी पार्थ पवारांशी जोडलेली असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. पार्थ पवारांची चौकशी झाल्यास अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असा दावा केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख संशयित शीतल तेजवानी सध्या फरार आहेत. बावधन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांनी वापरलेल्या परामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या पत्त्यावर सध्या कुलूप असल्याचं पोलिसांना आढळलं आहे. त्यामुळे पोलिसांसमोर शीतल तेजवानीचा शोध घेणं हे एक मोठं आव्हान ठरणार आहे. शीतल तेजवानीला अटक झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात पार्थ पवारांचा रोल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Local Body Elections : महाविकास आघाडीची ‘एकजूट’ तर महायुतीत गोंधळाचे ‘सूटबूट’!

पुण्यातील या जमीन खरेदी प्रकरणामुळे अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर पुन्हा एकदा चौकशीची छाया पडली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!