व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Municipal corporation : महानगरपालिकेत आमदारांनी वाचला समस्यांचा पाढा !

Municipal corporation : महानगरपालिकेत आमदारांनी वाचला समस्यांचा पाढा !

Issues raised by MLAs Dr. Nitin Raut, Krishna Khopde, Vikas Thackeray, Praveen Datke : सर्व समस्या निकाली काढून कामाची गती वाढवण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Nagpur : नागपूर शहरातील प्रलंबित विकास कामे आणि स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या सभा कक्षात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील आमदार उपस्थित होते. त्यांनी आपापल्या मतदारसंघातील समस्यांचा पाढाच यावेळी वाचला.

बैठकीत आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास ठाकरे, आमदार प्रवीण दटके तसेच महानगर आयुक्त व प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी शहरात सुरू असलेल्या विकास कामांचे संगणकीय सादरीकरण करण्यात आले. आयुक्त चौधरी यांनी नागपूर महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेत सध्याची प्रगती अडचणी आणि आगामी योजना याची सविस्तर माहिती दिली.

Thombre Vs Chakankar : चाकणकरांविषयी बोलणं दुसऱ्या रुपालीला महागात !

आमदारांनी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन, जलनिस्सारण, झोपडपट्टी पुनर्वसन आणि आरोग्य सुविधा यांसारख्या विविध समस्या अधोरेखित केल्या. काही विकास कामे विलंबाने होत असल्याचे निदर्शनास आणून देत आमदारांनी त्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व समस्यांची तात्काळ दाखल घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. जनतेशी थेट संबंध असलेल्या कामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये. प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने काम करून ठराविक कालमर्यादित कामे पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.

Local Body Elections : महायुती टिकवा, कार्यकर्ता वाचवा! शिंदे सेनेचे भाजपला आवाहन

बैठकीच्या शेवटी सर्व आमदारांनी शासन आणि पालकमंत्र्यांच्या सक्रिय भूमिकेचे स्वागत केले. तसेच जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करावे, असा निर्णय एकमताने घेण्यात आला. या बैठकीमुळे नागपूर महानगरातील विकास कामांना नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!