Maharashtra politics : सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी औलाद !

Tanaji Sawants anger at NCP : तानाजी सावंत यांचा राष्ट्रवादीवर संताप

Dharashiv : भूम आणि परंडा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार आगपाखड केली आहे. सावंत यांनी राष्ट्रवादीवर आरोप करताना म्हटलं की, ही राष्ट्रवादीची अशी औलाद आहे जी सत्तेशिवाय राहूच शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं होतं. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, असं मी आधीच सांगितलं होतं आणि गेल्या महिन्याभरात त्याचा प्रत्यय सर्वांना आला आहे, अशी टीका सावंत यांनी केली.

भूम येथे घेतलेल्या बैठकीत बोलताना सावंत यांनी अजित पवार गटावरही निशाणा साधला. हिंदुत्व त्यांनी स्वीकारलं का, युतीची तत्त्वं मान्य आहेत का, हे त्यांनी स्पष्ट करावं. मांडीला मांडी लावून बसतात, पण आमच्यावर त्यांना लादता, हे योग्य नाही, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. गरज नसताना तुम्ही त्यांना का घेतलं, असं म्हणत सावंत यांनी माजी आमदार राहुल मोटे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरही नाराजी व्यक्त केली.

Ananta Shinde Vijayraj Shinde : जिल्हाध्यक्षांवर केले गंभीर आरोप ; नंतर मागितली माफी!

दरम्यान, भूम-परंडा नगरपरिषद निवडणुकीत आमदार तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी गट या निवडणुकीत सावंतांविरोधात रणनीती आखताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठकही पार पडली.

यावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले की, भाजप, शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी, अ ब क ड सर्वांना आमच्या विरोधात एकत्र यावं लागतं, यातच आमचा विजय आहे. आम्हाला याचा काही फरक पडत नाही. मोठ्या पक्षांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी आम्ही गाफील बसणार नाही. एकला चलो रेचा नारा देत आम्ही लढू, असं सावंत यांनी स्पष्ट केलं.

Local Body Elections : खामगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप फ्रंट फुटवर!

भाजप-शिवसेना आणि इतर पक्षांनी एकत्र येऊन सावंतांना घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच सावंतांनी दिलेला हा हल्लाबोल आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या राजकारणाला रंग चढवणारा ठरणार आहे.