व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local Body Elections : बौद्ध समाजाला खरंच प्रतिनिधित्व की भाजपचा राजकीय डाव...

Local Body Elections : बौद्ध समाजाला खरंच प्रतिनिधित्व की भाजपचा राजकीय डाव ?

Is the Buddhist community truly represented or is it a political ploy by the BJP : अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या 10 नगराध्यक्ष पदांवर भाजपची नजर

Nagpur : नागपूर जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. हे करत भाजपने मोठं राजकीय पाऊल उचललं आहे. परंतु या नियुक्तीमागे बौद्ध समाजाला खऱ्या न्याय अर्थाने प्रतिनिधित्व देण्याची भावना आहे की, ही फक्त राजकीय गणित मांडण्याची युक्ती, असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.

भाजपला अलीकडच्या काही निवडणुकांमध्ये बौद्ध समाजाच्या मतांतील घट जाणवली होती. नागपूर जिल्ह्यातील एकूण २७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींपैकी १० नगराध्यक्ष पदे अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. अशा परिस्थितीत बौद्ध समाजाच्या नाराजीचे राजकीय परिणाम भाजपला महागात पडू शकतात, हे लक्षात घेऊन गजभिये यांच्या नावाचा ‘किंग पिन’ म्हणून वापर करण्यात आल्याचे मानले जात आहे.

Local Body Elections : काँग्रेसचं काही खरं नाही, तिसऱ्या आघाडीच्या हालचालींनी रंगवलं राजकारण !

अरविंद गजभिये हे स्थानिक पातळीवर ओळखले जाणारे बौद्ध समाजातील सक्रिय नेते आहेत. जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी जिल्हास्तरावर संघटनात्मक कामात चांगली पकड निर्माण केलेली आहे. त्यामुळे त्यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती हा भाजपचा सामाजिक संतुलन राखण्याचा प्रयत्न म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. मात्र बौद्ध समाजातील काही घटक याकडे फक्त ‘दाखवायचे दात’ म्हणूनही बघत आहेत.

Local body election : काँग्रेसकडून स्थानिक निवडणुकांसाठी मोठी घोषणा

भाजपने ही नियुक्ती करून एकाच वेळी प्रतिमा पुर्नस्थापित करण्याचा आणि काँग्रेसच्या बौद्ध मतदारांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही अरविंद गजभिये यांच्या माध्यमातून काँग्रेस विरोधी डाव भाजपला साधता आलेला नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिकेतील प्रत्येक वॉर्डात बौद्ध मतदार निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने भाजपचा हा समावेशकतेचा खेळ कितपत परिणामकारक ठरेल, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

Municipal Corporation Election : नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी सज्ज

बौद्ध समाजातील मतदारांना खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व आणि स्थानिक प्रश्नांवर उत्तर मिळतात का की, नेहमीप्रमाणेच निवडणुकीपूर्वीचा हा सौजन्याचा देखावा ठरतो, हे आगामी निवडणुकांच्या निकालानंतर स्पष्ट होईलच. गजभिये यांची चाल भाजपच्या फायद्याची ठरणार का की, समाजाचा विश्वास आणखी दुरावला जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

error: Content is protected !!