Local body election : मतदार यादीतील गोंधळावरून मनसे आक्रमक

Anger over lists in Bengali, Gujarati, Tamil : बंगाली, गुजराती, तमिळ भाषेतील याद्यांवर संताप

Mumbai : आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी मतदार याद्यांमधील मोठ्या गोंधळावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. चारकोप मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये बंगाली, गुजराती, ओडिया आणि तमिळ भाषेत नावे आढळल्याने मनसे कार्यकर्त्यांचा संताप उसळला. याच पार्श्वभूमीवर मनसे चारकोप विभागाध्यक्ष दिनेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

मोर्चादरम्यान, साळवी यांनी परभाषेत छापलेल्या मतदार याद्या थेट निवडणूक अधिकाऱ्याच्या अंगावर फेकत “या याद्या त्वरित मराठीत छापाव्यात” अशी मागणी केली. अन्यथा “मनसे स्टाईल आंदोलन” करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

मनसेने अलीकडच्या काही दिवसांत राज्यभर मतदार याद्यांमधील त्रुटी उघडकीस आणण्याचे अभियान सुरू केले आहे. त्यामध्ये चारकोप मतदारसंघ सर्वाधिक वादग्रस्त ठरला आहे. अनेक मतदारांची नावे मराठीऐवजी परभाषेत, तर काही ठिकाणी दुबार, तिबार आणि चौबार नोंदींमध्ये आढळून आली आहेत.

Local Body Elections : सपकाळांनी चिखलीतून दिला ‘सत्ता परत मिळवू’चा नारा !

यावेळी दिलेल्या निवेदनात निवेदनात मनसेने पुढील मुद्दे उपस्थित केले यात म्हणले आहे की, काही मतदारांची नावे मराठीत असून त्यांच्या छायाचित्रात मुस्लिम महिलांचे फोटो आहेत. काही महिला मतदारांच्या नावा पुढे पुरुषांचे छायाचित्र दिसत आहे.

एका मतदाराचे नाव तीन ते चार वेळा नमूद असून सर्व ठिकाणी वेगवेगळे तपशील दिले आहेत. माजी मंत्री आणि आमदार अस्लम शेख यांचे नावही विधानसभा यादीत दोन वेळा फोटोसह आढळले आहे. एकाच पत्त्यावर चार वेगवेगळ्या राज्यांतील मतदारांची नावे मराठी, उत्तर भारतीय, गुजराती आणि मुस्लिम समाजातील अशी आढळून आली आहेत.

Local Body Elections : बौद्ध समाजाला खरंच प्रतिनिधित्व की भाजपचा राजकीय डाव ?

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मुंबईसारख्या महानगरातील मतदार याद्यांमध्ये अनेक ठिकाणी तमिळ, गुजराती आणि ओडिया भाषेत नावे नोंदवली गेली आहेत. एका मतदाराचे नाव एकीकडे मराठीत, तर दुसरीकडे ओडिया भाषेत असल्याचे आढळले आहे.

2008 पूर्वी चारकोप विधानसभा मतदारसंघाचा EPIC कोड “DWJ” असा होता, तर नंतर “AVE” करण्यात आला. मात्र सध्याच्या यादीत दोन्ही कोड वापरले गेले असून काही ठिकाणी “TZB”, “THQ”, “NLF”, “XWC” असे इतर राज्यांशी संबंधित कोडही दिसत आहेत. यामुळे मतदार यादीच्या मूळ प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Local Body Elections : काँग्रेसचं काही खरं नाही, तिसऱ्या आघाडीच्या हालचालींनी रंगवलं राजकारण !

दिनेश साळवी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “मतदार यादीत परभाषेतील नावे कशी आली? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर आहेत, आणि जर अशी गफलत झाली, तर आम्ही गप्प बसणार नाही. निवडणूक आयोगाने तातडीने चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा मनसे आपली पद्धत दाखवेल.”

“राज ठाकरे यांनीच सर्व पदाधिकाऱ्यांना आपल्या प्रभागातील मतदार यादी तपासण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही त्याच मोहिमेचा भाग आहोत. आता चुकीच्या याद्या मागे घेतल्या नाहीत, तर मनसे पुन्हा रस्त्यावर उतरेल.”

Local body election : काँग्रेसकडून स्थानिक निवडणुकांसाठी मोठी घोषणा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर भाषणात सांगितले होते की, “नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर 550 मतदारांची नोंद आहे.” निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांमध्ये झालेल्या त्रुटींवर त्यांनी ताशेरे ओढले होते. यानंतर राज्यभर मनसे पदाधिकाऱ्यांना मतदार यादी पडताळणीचे आदेश देण्यात आले होते.

मतदार याद्यांमधील या गोंधळामुळे मुंबईतील निवडणुकीपूर्व वातावरण तापले असून, मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे निवडणूक आयोगावर दबाव वाढला आहे. या प्रकरणात चौकशीची मागणी होत असून, मतदार याद्यांच्या विश्वासार्हतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

_____