Local Body Elections : उमेदवारांना परवानग्यांसाठी वन विंडो सिस्टीम !

One-window system for candidates to get permits for campaign meetings and processions : दुबार मतदान झाल्यास होणार कठोर कारवाई

Nagpur : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. निवडणुकीत पारदर्शकता आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन पूर्ण तयारीत आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दुबार मतदान किंवा बनावट मतदार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दोन किंवा अधिक मतदार याद्यांमध्ये नाव असलेल्या मतदारांना हमी पत्र भरून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. मतदारांची ओळख आणि मतदानाची शुद्धता सुनिश्चित करण्यासाठी यंत्रणा अधिक दक्ष झालेली आहे. या निवडणुकीत उमेदवारांना अर्ज सादर करणे सुलभ व्हावे म्हणून वन विंडो सिस्टीम लागू करण्यात आली आहे. प्रचारासाठी आवश्यक सर्व परवानग्या, सभा, मिरवणुकीचे मार्ग, ध्वनिक्षेपकांचा वापर यांसाठी एकाच ठिकाणी मंजुरी देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Local Body Elections : निवडणुकीचा ज्वर चढतोय, इच्छुकांची कागदपत्रांसाठी धावपळ !

उमेदवारांना अल्प कालावधीत अर्ज भरता यावा, यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नेमले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. अर्ज तपासणी, तांत्रिक पडताळणी आणि कागदपत्र छाननीसाठी विशेष पत्रके नियुक्त केली जाणार आहेत. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्त समन्वय योजना तयार केली आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या अपप्रचारावर नजर ठेवण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष उभारले जाणार आहेत.

Zero Mile : झिरो माईल विकास प्रकल्पाला केंद्राची साथ समन्वयासाठी नेमले दोन वरिष्ठ अधिकारी

प्रचारादरम्यान होणारे वाद, जमावबंदी उल्लंघन किंवा बेकायदेशीर खर्च यावर कारवाईची तयारी निवडणूक विभागाने केलेली आहे. सर्व राजकीय पक्षांना शांततेत आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवण्याचे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. मतदारांमध्ये तणाव किंवा मांडणे टाळण्यासाठी प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने प्रत्येक मतदान केंद्रावर बंदोबस्त वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. निवडणुकीत कोणताही गैरप्रकार, बनावट मतदान किंवा आचारसंहितेचे उल्लंघन सहन केले जाणार नाही अशा कडक संदेश प्रशासनाने दिला. पारदर्शक, मुक्त आणि शांततापूर्ण निवडणूक घडवून आणण्याचा निर्धार निवडणूक विभागाने व्यक्त केला.