Bihar election result : ‘डेटा’ घसरला, जन सुराजचा ‘जन’ कुठे हरवला!

Strategist Prashant Kishor suffers setback of zero seats : रणनीतीकार प्रशांत किशोर यांना शून्य जागांचा धक्का

Patna : बिहार बदलण्याची घोषणा करणाऱ्या प्रशांत किशोर यांना 2025 च्या बिहार निवडणुकीत जनतेने ‘बदल नको’ असा स्पष्ट संदेश दिला आहे. तीन वर्षांचा प्रचंड गाजावाजा, हजारो किलोमीटरची पदयात्रा, लाखो व्ह्यूज, डिजिटल हवेचे बुडबुडे आणि ‘तिसरा पर्याय’ उभा करण्याचा दावा… पण प्रत्यक्ष निकाल आल्यावर जन सुराजला एकही जागा न मिळाल्याने प्रशांत किशोर यांची पहिलीच राजकीय परीक्षा शून्यावर गेली आहे.

मोदी, नितीश, ममता, जगन, केजरीवाल यांसारख्या नेत्यांना विजयी बनवणारा हा ‘सुपर स्ट्रॅटेजिस्ट’ जेव्हा स्वतःच्या राजकीय अभ्यासात उतरला, तेव्हा भूगोलानं थेट ‘रियालिटी चेक’ ठोकला.

कोनार गावातून यु एन पर्यंत झेपावलेले प्रशांत किशोर 2012 पासून निवडणुकीतील चमत्काराचे नाव बनले. ‘चाय पे चर्चा’, 3D रॅली, मोदींची ऐतिहासिक 2014 मोहीम, नितीश, ममता, स्टालिन, जगन, अमरिंदर, केजरीवाल अशा दिग्गजांसाठी त्यांनी आखलेले जिंकणारे रोडमॅप हे त्यांच्या कामगिरीचे सर्वोच्च क्षण.
पण हे यश इतरांच्या जमिनीवर, इतरांच्या संघटनांवर, इतरांच्या मतदारांवर उभे असल्याचं त्यांनीच मान्य केलं होतं.

Local Body Elections : नेत्यांचे मुंबईत बस्तान, स्थानिक उमेदवारांचे ‘वेट अॅण्ड वॉच’!

स्वतःचा पक्ष काढताना मात्र त्यांना कळलं
“जमिनीवर संघटना असेल तरच रणनीती चालते… नाहीतर व्हाट्सअप वरचे व्ह्यू जागा जिंकत नाहीत.” 2024 मध्ये दिमाखात सुरू झालेली ‘जन सुराज’ मोहीम, 2025 मध्ये थांबल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बदल हवा’ या हाकेसह 2024 मध्ये जन सुराजची घोषणा. 3,000 किमी पदयात्रा. डिजिटलवर 30 कोटी व्ह्यूज. 70 लाख स्थलांतरितांची गणितं. “त्यापैकी दोन-तृतीयांश आमच्याकडे येतील” असा आत्मविश्वास त्यांना होता त्यांना आता. पण निवडणुकीत 240 जागांवर उमेदवार उभे करूनही रिझल्टमध्ये ‘0’ हा डेटा दिसला. जितका आवाज डिजिटलवर होता, तितकी शांतता मतदान पेटीत दिसली.

Khamgao APMC : माझी पत्नी परत द्या! कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात धक्कादायक वळण

निवडणूक तज्ज्ञांच्या अंदाजाप्रमाणेच स्थानिक समीकरणं, जातीचं गणित आणि संघटनात्मक ताकद नसल्यामुळे जन सुराजचा प्रवास अंतिम टप्प्यात मंदावत गेल्यासारखं स्पष्ट दिसलं. आणि निकालानं तर ते तडकावूनच दाखवलं रणनीतीचा बादशाह, पण स्वतःच्या मैदानात मात्र धूळ चारली.

Local Body Elections : शिवसेनेचा (शिंदे) ‘पहिला’ उमेदवारी अर्ज दाखल

“नितीशकुमारांना 25 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारण सोडतो” असं आव्हान दिलेल्या प्रशांत किशोर यांच्यासमोर आता मोठा प्रश्न उभा आहे.
नितीश जिंकले, महाआघाडी कोसळली, एनडीएचा फायदा झाला… आणि प्रशांत किशोर यांच्या पक्षाचा प्रभाव महाआघाडीच्या नुकसानीवर आधारित ठरला.

हा पराभव केवळ निवडणुकीचा नाही…तो प्रशांत किशोर यांच्यासाठी एक स्पष्ट संदेश आहे. ज्या नकाशांवर तुम्ही इतरांना विजय मिळवून दिला, त्या नकाशावर स्वतःचं घर बांधायला वेगळीच मेहनत लागते.