Big blow to Congress; State Congress Secretary Rajabhau Tidke joins BJP : स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी भाजपची मोठी चल, भाजपकडून काँग्रेसचे कंबरडे मोडण्याची रणनीती वेगात
Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच नागपूरच्या राजकीय पटलावर मोठी हलचाल दिसू लागली आहे. काँग्रेसला मोठा धक्का देत पक्षाचे सचिव प्रसन्ना (राजाभाऊ) तिडके, माजी शहराध्यक्ष दिलीप सिरसाम, महिला शहराध्यक्ष कल्पनाताई मानकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपकडून काँग्रेसचे कंबरडे मोडण्याच्या मोहिमेची ही सुरुवात असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात.
कोराडी, नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्यात माजी आमदार टेकचंद सावरकर आणि भाजप तालुका मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी राजकीय वातावरण उत्साहपूर्ण असताना, तिडके यांच्या प्रवेशाने स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता राजकारणात चर्चेत आली आहे. तिडके यांच्या भाजप प्रवेशामुळे नागपुरातील राजकीय समीकरणे पलटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
Dr. Mohan Bhagwat : संघ स्वयंसेवकांच्या भावनिक शक्तीवर चालतो !
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी नगरसेविका नंदा इनवाते, सावित्री काटकर, वर्षा लारोकर, तसेच नाना इंगळे, राजेंद्र जैस्वाल, पृथ्वीराज गुजर, नितेश सुपारे यांचाही समावेश आहे. काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे हे सर्व पदाधिकारी भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसची ताकद विशेषतः उत्तर नागपूर भागात मोठ्या प्रमाणात कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
राजकीय वर्तुळात असा अंदाज व्यक्त केला जातो की, तिडकेसारख्या प्रभावी कार्यकर्त्यांचे भाजपात आगमन हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेसला अडचणीत आणण्याचा रणनीतिक प्रयत्न आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलह, नेतृत्वाचा अभाव आणि गटबाजीचा फायदा भाजप घेत असल्याचे स्पष्ट दिसते आहे.
Municipal Corporation Election : महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवार निवड प्रक्रियेला गती !
या प्रवेश कार्यक्रमात चांगोजी तिजारे, मनीराम यादव, शरद भोयर, मंगेश ठोंबरे, नरेश मोटघरे, खुशाल तांबडे, रमेश कुंभलकर, भूषण सावरकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना झालेल्या या हालचाली राजकीय अर्थाने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. तिडके आणि त्यांच्या समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश काँग्रेससाठी मोठी धोक्याची घंटा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
————








