Sudhir Mungantiwar : उशिराने उमजले वास्तव , चंद्रपूरचे खासदार म्हणून मुनगंटीवारांचीच गरज होती!

If Mungantiwar were an MP… the public’s vote was heard on social media : विधानसभेतूनही धडाकेबाज कामगिरी; उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीत मुनगंटीवारांचे नेतृत्व ठरतेय विदर्भाचे बेंचमार्क

Chandrapur : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये आ. सुधीर मुनगंटीवार यांचा झालेला पराभव हा फक्त एक राजकीय निकाल नव्हता, तर चंद्रपूरच्या विकासाचा वेग थांबवणारा टप्पा होता, हे सत्य आता उशिरा का होईना लोक मान्य करू लागले आहेत. त्यानंतर विधानसभेत विक्रमी मतांनी विजयी होत त्यांनी आपल्या नेतृत्वाची ताकद पुन्हा सिद्ध केली. मात्र, खासदार पदावरून मिळू शकणारा केंद्र निधी, मोठ्या योजना आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प जिल्ह्यापर्यंत वेगाने पोहोचवण्याची क्षमता असणाऱ्या नेतृत्वाला मतदारांनी त्या वेळी नाकारले आणि आज त्याची किंमत जिल्ह्याला विकासातील धीम्या गतीच्या रूपाने चुकवत असल्याची जाणीव लोकांना होऊ लागली आहे.

मुनगंटीवारांना खासदार म्हणून निवडून न देणे ही मोठी चूक होती.
सोशल मीडिया असो किंवा लोकांच्या चर्चेत एकच भावना ठळकपणे पुढे येत आहे .आजही चंद्रपूरच्या जनतेच्या मनात आमदार सुधीर मुनगंटीवारांविषयीचा विश्वास, प्रेम आणि कृतज्ञता तितकीच घट्ट असल्याचं सोशल मिडियावरून जोरदारपणे जाणवतं आहे.मुनगंटीवार खासदार असते तर आज चंद्रपूरची ओळख भारताच्या नकाशावर वेगळ्याच उंचीवर उभी राहिली असती, अशा असंख्य प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. विदर्भाच्या विकासाला त्यांनी दिलेल्या गतीने जनतेत निर्माण केलेला आशावाद आजही कायम आहे.

Sudhir Mungantiwar : ५३२ जीवनांना नवा प्रकाश: मुनगंटीवारांचा उपक्रम ठरला सेवाभावाचा दीप !

स्वतः आमदार मुनगंटीवारांनीही अनेकदा सांगितले आहे की, ‘जिंकलं तर माजायचं नाही अन् पराभव झाला म्हणून लाजायचं नाही, खरं तर मंत्री असताना त्यांनी जेवढ्या वेगाने कामे केली, तोच वेग आजही दिसून येतो. बल्लारपूर विधानसभेतील विकासाची गती महाराष्ट्रभर आदर्श ठरत आहे. सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक… जवळपास प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दिलेला टेम्पो कायम जाणवतो.

Sudhir Mungantiwar : लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीसाठी ३० दिवसाची मुदतवाढ द्या

शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा मजबूत पाया आमदार मुनगंटीवार यांनी रचला आहे. मुल येथे नुकतेच पॉलिटेक्निक कॉलेज मंजूर त्यांनी केले आहे.एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विकासकामांना मिळालेला वेग वाढला आहे. भव्य कॅन्सर हॉस्पिटलचे काम पूर्णत्वाकडे आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते  चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे उद्घाटन लवकरच होणार असून चंद्रपूर जिल्हा भविष्यात शैक्षणिक हब बनण्याच्या दिशेने ज्या वेगाने धावत आहे, त्यामागे मुनगंटीवारांची दृष्टी स्पष्ट दिसते.

Sudhir Mungantiwar : आपल्या पाठपुराव्यामुळे न्यायालय इमारतीला मंजुरी..आभारी आहोत, आ. सुधीरभाऊ!

खासदार असते तर आज उद्योगधंदे, नवनवे प्रकल्प, तसेच चंद्रपुरातून पुणे-मुंबई रोज धावणारी रेल्वे आज प्रत्यक्षात आली असती, अशी चर्चा नागरिकांमध्ये सर्रास दिसते आहे.आमदार असूनही एवढी कामे झाली असतील, तर खासदार असते तर चंद्रपूर विकासाची राजधानी ठरली असती” अशा भावना नेटकरी व्यक्त करत आहेत.