The real battle will begin after the objections are resolved : राजकीय वातावरण तापले; २६ नोव्हेंबरला चिन्हवाटप
Buldhana जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमधील २८ नगरसेवक स्थानांवर आणि ११ नगराध्यक्ष पदांवर होत असलेली निवडणूक आता उच्चांकी चुरशीला पोहोचली आहे. नगराध्यक्षपदासाठी ८५ तर नगरसेवक पदांसाठी तब्बल १,०१६ उमेदवार रिंगणात असून २६ नोव्हेंबरला आक्षेपांचा निपटारा झाल्यानंतर खरी रणधुमाळी रंगणार आहे.
त्यापूर्वीच काही ठिकाणी झालेल्या विचित्र आघाड्या, अनेक ठिकाणी उतरणारे प्रभावी अपक्ष उमेदवार, तसेच पक्षांतील अंतर्गत मतभेद यामुळे मतविभाजन हा निर्णायक मुद्दा ठरत आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्वच लढती तिरंगी, बहुकोनी आणि संघर्षमय बनल्या आहेत.
जळगाव जामोद : भाजप-काँग्रेस थेट सामना, पण अपक्षांची गणिते बिघडवणारी एंट्री
येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत असली तरी एका दमदार अपक्ष उमेदवारामुळे नगराध्यक्ष पदाचे गणित ढवळून निघणार असल्याचे संकेत आहेत.
वंचित बहुजन आघाडीची वजाबाकी नेमकी कोणावर होणार, हे अद्याप स्पष्ट नाही.
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात त्रिकोणी लढत आहे. एक अपक्ष आणि काँग्रेसचा एक उमेदवार आधीच बिनविरोध निवडून.
Local Body Elections : झेडपीत प्रशासक राज, विकासकामांवर आमदारांची नजर!
लोणार : शिंदेसेना व उद्धवसेना आमने-सामने!
काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना आणि भाजप यांच्यात चौरंगी लढत.
शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्षफुटीनंतरचा आपापला जनाधार सिद्ध करण्याची खरी परीक्षा.
अशीच परिस्थिती मेहकरमध्येही.
देऊळगाव राजा – सिंदखेड राजाः आघाड्यांची आग आणि तापलेले राजकारण
देऊळगाव राजात राष्ट्रवादी (अ.प.)-भाजप विरुद्ध शरद पवार गट आणि शिंदेसेना असा विचित्र संगम.
सिंदखेड राजातही बहुकोनी लढत असून आ. मनोज कायंदे, माजी आ. डॉ. राजेंद्र शिंगणे व डॉ. शशिकांत खेडेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Akot Municipal Council : नगराध्यक्षाच्या उमेदवाराचे शपथपत्र ठरले वादग्रस्त
नांदुराः पारंपरिक शत्रुत्व, पण नवा पेच
येथे भाजप विरुद्ध नगरविकास आघाडी अशी नेहमीची लढत;
मात्र पूर्वी उपाध्यक्ष राहिलेला अपक्ष पुन्हा रिंगणात उतरल्याने मतविभाजन निश्चित.
येथील खरी प्रतिष्ठा लढत —
आ. चैनसुख संचेती विरुद्ध माजी आ. राजेश एकडे.
संचेती यांनी गतवेळी एकडेंचा पराभव केला असल्याने समीकरणांवर अधिकच चर्चा.
Akola Municipal Corporation : प्रभाग यादी दुरुस्तीच्या मुद्द्यावर ‘स्टंटबाजी’
चिखली : मविआ–शिंदेसेना–राष्ट्रवादी (अ.प.) चे अनोखे गठबंधन
येथे भाजप, काँग्रेससमवेत मविआ-शिंदेसेना-राष्ट्रवादी (अ.प.) असे विलक्षण आणि अभूतपूर्व समीकरण.
कारण स्थानिक स्वराज्य निवडणूक असूनही परिस्थिती हायप्रोफाइल.
तगडे पक्ष + तीन पक्षांचे संयुक्त समीकरण = काट्याची लढत, निकाल अनपेक्षित!
Local Body Elections : महिलाशक्ती ठरणार ‘गेम चेंजर’, ‘पिंक बूथ’द्वारे महिलांचा सन्मान
खामगाव : फुंडकर विरुद्ध सानंदा – प्रतिष्ठेची लढाई
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (अ.प.) त्रिकोणी लढतीत
कामगार मंत्री आ. आकाश फुंडकर आणि
माजी आमदार दिलीपकुमार सानंदा
यांची प्रतिष्ठा पणाला.
काँग्रेसची “साइलेंट भूमिका” काय असेल याकडे सर्वांचे लक्ष.
खामगाव बाजार समितीत आधीच सानंदा यांना फटका बसल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची चाचणी.
महत्त्वाचे समीकरण : मतविभाजन
विचित्र आघाड्या
अपक्षांची अनपेक्षित एन्ट्री
पक्षांतील अंतर्गत नाराजी








