Decision on complaints regarding cotton procurement will be taken after elections : अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, गंभीर दखल घेतल्याचा दावा
Akot या भागातील शेतकऱ्यांनी कापूस खरेदीवर मर्यादा घातल्या जात असल्याबाबत तक्रारी मांडल्या असून, त्या तक्रारींची मी गंभीर दखल घेतली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले.
अकोट येथे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, “मी स्वतः शेतकरी असून येथे उपस्थित अनेक जणही शेतकरी आहेत. शेतकरी हीच तुमची-माझी जात आहे. बळीराजा लाखो लोकांचा पोशिंदा आहे. तो अडचणीत आला तर महाराष्ट्र अडचणीत येतो.”
Devendra Fadnavis : ‘देवेंद्र…!’ भरसभेत महिलेने हाक मारली, सारेच गोंधळले
ते पुढे म्हणाले, “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यावर राज्य सरकारने ४४ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून मदत दिली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रामीण भागाचा विकास आणि बळकटीकरण हेच आमचे ध्येय आहे.”
धर्म किंवा जातभेदाच्या राजनीतीपासून आम्ही दूर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “गेली ३५ वर्षे समाजकारण आणि राजकारणात असूनही कधीही नातेसंबंध, जात-पात किंवा भेदभावाचा विचार केलेला नाही. समाजाचे भले, सकारात्मक परिवर्तन आणि विकास याच भावनेने आम्ही काम करत आहोत,” असे पवार म्हणाले.
Local body election : ‘अहंकारामुळे रावणाची लंका जळाली’ – एकनाथ शिंदे
अकोट शहर धार्मिक-सांस्कृतिक वारसा लाभलेले असून सर्व धर्म-जातिचे नागरिक सलोख्याने नांदतात, परंतु शहरातील वीज, पाणी, रस्ते, मैदाने यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत अनेक त्रुटी असल्याचे त्यांनी नमूद केले. “मागील सत्ताधाऱ्यांची गुत्तेदारी सर्वश्रुत आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी आम्ही नव्या दमाचे, प्रामाणिक आणि विकासाभिमुख उमेदवार लोकांसमोर उभे केले आहेत,” असेही ते म्हणाले.








