Breaking

Sexual exploitation of girls and women in the name of counseling : एसआयटी तपासणार मानसोपचारतज्ज्ञाची ‘मानसिकता’

 

SIT to check ‘psychiatry’ of psychiatrist : समूपदेशनाच्या नावावर मुली व महिलांचे लैंगिक शोषण

Nagpur नैराश्यात गेलेल्या शंभरावर मुली-महिलांचे समूपदेशन करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञानेच लैंगिक शोषण केले. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. मानसोपचारतज्ज्ञांची मानसिकता तपासण्याचे काम आता एसआयटी करणार आहे.

या प्रकरणातील पाळेमुळे खोदून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. आरोपी समूपदेशक १३ वर्षांपासून मानेवाडा परिसरात समूपदेशन केंद्र चालवत होता. तसेच तो नागपूरसह विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात जाऊन ठिकठिकाणी समूपदेशन शिबिरं घेत होता. त्यात तो विद्यार्थिनी व महिलांशी संवाद साधून ‘तुम्ही नैराश्यात असून माझ्या केंद्रात आल्यावर तुम्हाला योग्य मार्ग मिळेल’ असे आमिष दाखवत होता.

Washim Police : १.१५ काेटींची लुटमार, फिर्यादीच झाला आराेपी!

त्याच्या याच आमिषाला अनेक शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी, विवाहित महिला, विधवा आणि उच्चशिक्षित महिलासुद्धा बळी पडल्या आहेत. पीडितांपैकी अनेक तरुणींचे सध्या लग्न झालेले आहेत. त्या विवाहित असतानासुद्धा मानसोपचारतज्ज्ञ त्यांना शारीरिक संबंधासाठी बळजबरी करीत होता. विवाहित महिलांनी नकार दिल्यास त्यांचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफिती इंस्टाग्राम आणि फेसबुकवर टाकण्याची धमकी देत होता.

त्यामुळे अनेक विवाहित महिला आपला संसार वाचविण्यासाठी त्याच्या क्लिनिकमध्ये जाऊन त्याच्या लैंगिक शोषणाच्या बळी पडत होत्या. त्याने आतापर्यंत शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषण केल्याची चर्चा आहे. महिन्याभराअगोदर यातील एका पीडितेने त्याचा छळ असह्य झाल्याने पोलिस ठाणे गाठले व त्याचे काळे कृत्य समोर आले.

Local Body Elections : अखेर मिनी मंत्रालयाचा कारभार प्रशासकांच्या हाती!

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्याच्या मोबाईल, संगणकात अनेक व्हिडीओ आहेत. त्याच्या आधारावर एसआयटीकडून सखोल तपास करण्यात येणार आहे. हे प्रकरण पोलिसांनी अत्यंत गोपनीय ठेवले असून याबाबत कुणीही पोलीस अधिकारी बोलायला तयार नाही.