Local body election : आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे !

Ravindra Chavan Statements discussions held at the campaign meeting : रवींद्र चव्हाण; प्रचारसभेत विधान, चर्चा रंगल्या

Mumbai: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. “आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे,” असे वक्तव्य करत प्रचारसभेत बोलताना त्यांनी कोरोनाच्या काळातील केंद्र सरकारच्या धोरणांचा उल्लेख केला शिरोळ आणि कुरुंदवाड येथे झालेल्या महायुती आणि ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत चव्हाण बोलत होते. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणात्मक व निर्णायक कामामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळाली असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.

राज्याच्या प्रगतीबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, “राज्याचा प्रमुख प्रामाणिकपणे आणि जोरदार धोरणात्मक काम करत असेल, तर शहरांचा विकास वेगाने होतो. लोकांच्या जीवनमानात बदल हवा असेल, तर अंतिम निर्णय घेण्याची ताकद असलेले मुख्यमंत्रीच विकासाचा मार्ग दाखवतात.” यावेळी त्यांनी जनतेला महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले.

Sujay Vikhe Patil : हे जेवण आहे, प्रसाद नाही, शिर्डीत पुन्हा संतापाची लाट

केंद्र सरकारच्या योजनांचा उल्लेख करताना त्यांनी पीएम-किसान योजना, आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड, अन्न सुरक्षा योजना आणि कोरोनाकाळातील लसीकरण मोहीम यांचा विशेष उल्लेख केला. “कोरोना काळात मोफत लस उपलब्ध करून दिली म्हणून आज आपण सर्वजण जिवंत आहोत. मात्र त्या काळातील परिस्थिती लोक लवकर विसरतात,” असे ते म्हणाले.

या सभेत चव्हाण यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी सरकारच्या काळातील वीजटंचाईची आठवणही करून दिली. “पूर्वी दिवसाला सहा-सहा तास लोडशेडिंग व्हायचं, उद्योगधंदे त्रस्त होते. आज महाराष्ट्रात लोडशेडिंग नाही. हे बदल ओळखले पाहिजेत,” असे सांगत त्यांनी पूर्वीच्या सरकारवर निशाणा साधला. जनतेच्या हिताच्या योजनांपैकी अन्न सुरक्षा योजनेचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, “कुणीही उपाशी राहू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने अन्न सुरक्षा योजना लागू करण्यात आली.”

Nilesh Rane Vs BJP : “गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही

निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची असली तरी भविष्यातील विकासासाठी योग्य निर्णयाची गरज असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली. “या नगर परिषदांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद असणार आहे. प्रामाणिक काम करणाऱ्यांना सत्ता द्या, विकासाचा वेग थांबू देऊ नका,” असे आश्वासन देत त्यांनी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले.

चव्हाण यांच्या “लसीमुळे आपण जिवंत आहोत” या विधानामुळे राजकीय चर्चा तापल्या असून सोशल मीडियावरही या वक्तव्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आगामी निवडणुका जवळ येत असताना नेत्यांच्या विधानांनी वातावरण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

_____